आम्लराज म्हणजे काय

आम्लराज म्हणजे काय

प्रश्न

 आम्लराज (Aquaragia) म्हणजे काय ?

उत्तर

 

 

आम्लराज हा अतिशय क्षरणकारी (Corrosive) तसेच वाफाळणारा (Fuming) द्रव आहे. संहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि संहत नायट्रिक आम्ल 3 : 1 या प्रमाणात घेऊन त्यापासून आम्लराजचे ताजे मिश्रण तयार करतात. जवळपास सर्व पदार्थ यात विरघळतात. सोने आणि प्लॅटिनम या धातूंना विरघळवू शकणाऱ्या काही अभिक्रियाकारकांपैकी हा एक आहे.

Previous Post Next Post