वृद्धदृष्टिता म्हणजे काय ? त्याचे कारण सांगा. वृद्धदृष्टिता या दोषांचे निराकरण कसे करतात ?

वृद्धदृष्टिता म्हणजे काय ? त्याचे कारण सांगा. वृद्धदृष्टिता या दोषांचे निराकरण कसे करतात ?

प्रश्न

 वृद्धदृष्टिता म्हणजे काय ? त्याचे कारण सांगा. वृद्धदृष्टिता या दोषांचे निराकरण कसे करतात ?

उत्तर

ज्या दृष्टिदोषामध्ये वृद्ध माणसांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे व सूस्पष्ट दिसणे कठीण होते, त्या दोषास वृद्धदृष्टिता म्हणतात. 

या दोषाचे कारण : सामान्यत: वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती कमी होते, म्हणजेच डोळ्याजवळील भिंगाचे स्नायू भिंगाचे नाभीय अंतर बदलण्याची क्षमता गमावतात. वयस्कर माणसांचा निकटबिंदू डोळ्यापासून मागे सरतो. त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्ट दिसणे कठीण होते. 

योग्य शक्तीचे बहिर्गोल भिंग वापरून या दोषाचे निराकरण करतात. या भिंगामुळे प्रकाशकिरण नेत्रभिंगावर पडण्यापूर्वी त्यांचे योग्य प्रमाणात अभिसरण होते. नंतर नेत्रभिंगामुळे प्रकाशकिरणांचे आणखी अभिसरण होऊन वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होते. 

Previous Post Next Post