टिपा लिहा भारतीय स्त्रीवादी इतिहासलेखन

टिपा लिहा भारतीय स्त्रीवादी इतिहासलेखन

प्रश्न 

टिपा लिहा भारतीय स्त्रीवादी इतिहासलेखन

 उत्तर 

 

i) भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉ. रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहासलेखिका होऊन गेल्या. घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायी वागणूक आणि स्त्री-पुरुष असमानता यांवर या लेखिकांनी लेखन केले.

ii) दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात स्त्रियांकडून लेखन केले गेले.

iii) स्वातंत्र्योत्तर काळात दलित स्त्रियांचे जीवन, सामाजिक वर्ग, जात इत्यादीवर शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांचे संकलन 'रायटिंग कास्ट, जेंडर : रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज' या ग्रंथात केले आहे.

iv) मीरा कोसंबी या स्त्रीवादी लेखिकेने आपल्या 'क्रॉसिंग थ्रेशोल्डस् : फेमिनिस्ट एस्सेज़ इन सोशल हिस्टरी' या पुस्तकात महाराष्ट्रातील डॉ. रखमाबाई, पंडिता रमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावर निबंध लिहिले आहेत.

Previous Post Next Post