टिपा लिहा चित्रकथी परंपरा

टिपा लिहा चित्रकथी परंपरा

प्रश्न 

टिपा लिहा चित्रकथी परंपरा

 उत्तर 

 

i) कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण-महाभारत यांमधील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे 'चित्रकथी परंपरा' होय.

ii) या परंपरेची माहिती चालुक्य राजा सोमेश्वर याने बाराव्या शतकात लिहिलेल्या 'मानसोल्लास' किंवा 'अभिलषितार्थचिंतामणी' या ग्रंथात आढळते.

iii) कोकणातील कुडाळजवळच्या पिंगुळी गावातील ठाकर आदिवासींनी ही परंपरा जतन केली आहे. म्हणून चित्रकथी परंपरेला 'पिंगुळी परंपरा' असेही म्हटले जाते. 

iv) चित्रकथी परंपरेत कागदावर चित्र काढून ती नैसर्गिक रंगात रंगवली जातात. साधारणत: ३० ते ५० चित्रांत एक कथा पूर्ण केली जाते. ही परंपरा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Previous Post Next Post