टिपा लिहा इंडियन म्युझियम

टिपा लिहा इंडियन म्युझियम

प्रश्न 

टिपा लिहा इंडियन म्युझियम


 उत्तर 

 

i) कोलकाता येथे असणारे इंडियन म्युझियम हे भारतातील सर्वांत मोठे आणि प्राचीन वस्तुसंग्रहालय आहे.

ii) नॅथानिएल वॉलिक या डॅनिश (डेन्मार्क) वनस्पतीशास्त्रज्ञाने १८१४ साली ते एशियाटिक सोसायटीतर्फे स्थापन केले.

iii) कला, पुरातत्त्व आणि मानवशास्त्र असे या संग्रहालयाच्या व्यवस्थापनाचे  प्रमुख तीन विभाग आहेत. 

iv) प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, जतन व संवर्धन, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा अशा विविध विभागांमार्फत म्युझियमचे काम चालते. भारताच्या सांस्कृतिक वारशातील हा एक महत्त्वाचा वारसा आहे.


Previous Post Next Post