मानवी मेंदूची रचना स्पष्ट करा

मानवी मेंदूची रचना स्पष्ट करा

मानवी मेंदूची रचना स्पष्ट करा.  

उत्तर 

मानवी मेंदूची संरचना जटिल असते. मानवी मेंदूचे तीन प्रमुख भाग पडतात. अग्रमस्तिष्क, मध्यमस्तिक, पश्चमस्तिक. 

1) अग्रमस्तिक : अग्रमस्तिक हा मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला प्रमुख भाग आहे. या भागात गंध, दृष्टी, श्रवण यांसारख्या संवेदनांची क्षेत्रे असतात. येथे संवेदी ग्राहीकडून माहिती ग्रहण करून अर्थ लावला जातो. त्याची तुलना आधीच साठवून ठेवलेल्या माहितीशी केली जाते. यांना सहयोगी केंद्रे म्हणतात. त्यानंतर प्रतिसाद दिला जातो. तो ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण करणाऱ्या प्रेरक क्षेत्राकडे पाठवला जातो. 

2) मध्यमस्तिक : मेंदूच्या या भागाकडून अनैच्छिक हालचालींचे नियंत्रण केले जाते. 

3) पश्चमस्तिक : पश्चमस्तिष्काचा उपभाग असलेल्या लंबमज्जेद्वारे रक्तभिसरण आणि श्वसन यांचे नियंत्रण केले जाते. पश्चमस्तिष्काचा उपभाग असलेल्या अनुमस्तिष्क या भागाकडून ऐच्छिक हालचालींचा समन्वय केला जातो.     

Previous Post Next Post