डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी आपल्या देशातील "क्रीडासंस्कृती रुजविण्याची गरज आहे" या विधानाचे परामर्श द्या ?
किंवा
"क्रीडा स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडासंस्कृती जोपासावी लागते" असे नरेंद्र दाभोळकर कां म्हणतात ?
किंवा
भारतीय खेळाडूंची कामगिरी व क्रीडा संस्था आणि सरकारचे दुर्लक्ष यावर डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी केलेले भाष्य उलगडून द्या ?
उत्तर
प्रस्तुत लेखामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंची निम्न कामगिरी आणि क्रीडा संस्था तसेच सरकार यांचे त्याकडे होणारे दुर्लक्ष या बाबत प्रकाश झोत टाकला आहे. तसेच आपल्या देशात क्रीडासंस्कृती रुजविण्याची गरज प्रकट केली आहे.
लेखाच्या सुरुवातीलाच अथेन्स येथील ऑलिंपिक्स मध्ये भारताच्या वाट्याला आलेल्या कांस्यपद मिळणे म्हणजे खूप मोठा आनंद व्यक्त करणे होय. शंभर कोटी लोकसंख्या असणाऱ्या अशा देशामध्ये एवढे लहानसे यश कसे मिळाले याकडे पाहिजे; तर राजकारण, भ्रष्टाचार, पैशाची कमतरता, प्रशिक्षणाचा अभाव असे अनेक प्रश्नांची मुद्दे समोर येतात.
क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी दूरगामी दृष्टीने दीर्घकाळ परिश्रम करावे लागते. खेळाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी लक्षावधी लोक ज्या वेळी उत्साहाने मैदानात उतरणार नाहीत तो पर्यंत क्रीडाक्षेत्र विकसित होणार नाही. आपल्या देशाच्या वातावरणाशी, आर्थिक बकुबशी सुसंगत अशा कांही खेळांसाठी, क्रीडासंस्कृती तयार होणे गरजेचे आहे. त्यासाठी खेळाकडे जास्ती जास्त लोक मन:पूर्वक वळण्यासाठी तालुका पातळी पर्यंत स्टेडियम बांधून क्रीडासंस्कृतीरुजत नाही तर त्या स्टेडियमवरची मैदाने लोकांच्या खेळाने खळाळून गेली पाहिजे.
क्रीडासंस्कृतीचा विकास करण्यासाठी स्वाभाविकच खेळही असे हवेत जे या देशातल्या गोर-गरिबांना परवडणारी असावेत. पण अगदी उलट होत आहे. केवळ 'क्रिकेट' या खेळालाच महत्व दिले जाते. बाकीचे सर्व खेळ जणू त्रिय्यम दर्जाची आहेत. अशी मानसिकता झाली आहे.
इथल्या शाळेकरीमुलाला मागच्या एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळालेल्या असीम खेळाडूंचे नावही ठाऊक नसते; पणसाधे रणजी क्रिकेट सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या नावाची यादीच पाठ असते पण जगातले डझनभरही देश न खेळणारा हा महागडा खेळ माझ्या देशाच्या क्रीडा संस्कृतीचा पाया नाही; तसेच ऑलिंपिक्स मध्ये शुटींग व टेनिस या स्पर्धेतील खेळाडूंकडून भारताला पदकांची अपेक्षा आहे. ही भरपूर खर्चिक खेळ या देशातील लाखातील एखाद्यालाही परवडणारे नाहीत अशा अवस्थेत क्रीडासंस्कृती विकास होऊ शकत नाही
क्रीडा संस्कृतीचा आदर्श घेण्यासाठी दारिद्रयाने ग्रासलेल्या मागासलेल्या वेढलेल्या इथेपिया, केनिया या सारख्या देशांनी अनेक वेळा ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक खडतर प्रवास करूनही त्यांनी मॅथेरॉन स्पर्धा जिंकली आहे. पायात खेळाचे बुटही नसलेले हे स्पर्धक सुवर्णपदक विजेते होतात. पळण्याचा आनंद मनसुराद घेतात हा त्यांच्या राष्ट्रीय क्रीडासंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. 'पळणे' या क्रीडा प्रकारावर प्रेम करणारे देशावासिस गावच्या रस्त्यावरून नव्हे तर डोंगराच्या उतारावरून आनंदासाठी पळत असतात. अशा देशाला सुवर्णपदक मिळते हे गोेरवास्पद गोष्ट आहे. कृत्रिम ट्रॅकची गरज असलेल्या व आपल्या गरीब देशाला न परवडणाऱ्या १००, २००, ४०० मीटरर्स अंतराच्या धावण्याच्या स्पर्धेसाठी हे जीव टाकत नाहीत. आपल्या राष्ट्रीय क्रीडासंस्कृतीचासोजेशा अशा पाच हजार, दहा हजार मीटर व मॅरेथाॅन अशाच धावण्याच्या स्पर्धेसाठी स्वत:ला घडवितात. आपल्या भारत देशातील लोक हे वेगवेगळा क्रीडा प्रकारामध्ये खळले पाहिजे. यासाठी शिक्षणसंस्था, राजकीय, सामाजिक घटकांनी, प्रसारमाध्यमांनी एखाद्या व्यक्तिची प्रतिमा पाहून त्या खेडाळूला प्रयोजक मिळवून देणे गरजेचे आहे. शासकीय क्रिडाविषयक धोरणामध्ये विविध क्रिडा प्रकारातील खेळांचा समावेश असावा. जेणे करून कुमारवयातली ही पिढी तरुण्यात पदार्पण करताना त्यांच्या प्रतिभेला साजेसा आनंद समाजात घेऊन जातील. प्रसार माध्यमें या क्रीडासंस्कृतीचा आकर्षकपणा प्राप्त करू द्यावी तरच क्रीडासंस्कृतीचा विकास होईल.
आपल्या भारत देशात मात्र अगदी क्रीडा संस्कृतीचा स्वत:च्या संकुचित हितसंबंधासाठी जसे पक्ष काढले व वापरले जातात त्याच पद्धतीने असोसिएशन निघतात. बीच हॉलिबॉल व तायकोंदो भारतात कुठे आणि किती प्रमाणात खेळला जातो ? पण त्या खेळाच्या असोसिएशनला भारतीय पातळीत मान्यता दिली जाते. परंतु येथे खेळाडुंचा विकास घडत नाही. खेळातील नैपुण्य कोेशल्य प्राप्त होत नाही. त्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही कधीतरी ऑलिंपिकक्यला पात्र लावावयास मिळणार यासाठी आनंदीत राहतात. ऑलिंपिकक्यला जातात मात्र येतांना ते रिकामेच हात हवलत परत येतात. ही आजची वास्तव शोकांतिका आहे.
भारत या देशाचा जनसमूह प्रचंड मोठा आहे की, ज्याच्या जीवन कोेशल्याची अभिव्यक्ती या देशाच्या संस्कृतीच्या सन्मानाचा भाग कधी झाला नाही. उदा: 'लिंबाराम' हा आदिवासी थोडी संधी मिळाली तर त्याने धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात ऑलिंपिक्य पर्यंत धडक मारली. निसर्गाचे ज्याला पळण्याची तिप्पट क्षमता दिली अशा धावत्या जनावरामागे पळून त्याला पकडणारा पारधी, अद्भूत खेळ करणारा डोंबारी यांच्या गुणवत्ता कडे कोणीही लक्ष देत नाही. त्यांना नीटपणे हेरून, संधी, प्रशिक्षण, हिमंत, दिली तर पळण्याच्या वा जिम्नॅस्टिकच्या स्पर्धेत देशाचे नाव कोरले जाईल. पण त्यासाठी पाहिजे वेगळ्या संस्कृतीचे भान. क्रीडासंस्कृती म्हणजे केवळ खेळचा प्रचार नाही तर त्याबरोबरच विशेषतांच्या युगात स्पोर्टस फोटोग्राफी, स्पोर्टस, मेरिसिन, स्पोर्टस जर्तालिझम अशा जवळपास चाळीस शाखा तयार होतात. त्याचीही वानवाच आपल्याकडे आहे. हे देखील क्रीडासंस्कृती निर्मिताना प्रतिकूलच स्थिती आहे.
क्रीडा स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडासंस्कृती जोपासावी लागते. त्यामध्ये उत्तम देखण्या इमारती, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी, देशी-विदेशी उत्तमोत्तम प्रशिक्षण असावे यासाठी शासकीय धोरण अनुकूल असावे.
थोडक्यात मानवी जीवनातील खेळांचे महत्त्व डॉ. नरेंद्र दाभोळकरांनीसांगितले. त्याच बरोबर शासकीय खेळांचे धोरण असोसिएशनांचा भोंगळपणा कारभार, खेळाडूची खरी ओळख यांचा अभाव, एकाच खेळाला महत्त्व देऊ नये, सर्व क्रीडाप्रकार खेळले जावे असे विचार मांडले.