भारत व ब्राझील या देशांतील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या

भारत व ब्राझील या देशांतील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या

प्रश्न

 भारत व ब्राझील या देशांतील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या

उत्तर

 

 

i) भारत व ब्राझील या दोन देशांपैकी ब्राझीलमध्ये अधिक नागरीकरण व भारतात कमी नागरीकरण झाल्याचे आढळून येते. 

ii) २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ ३१.२ टक्के होते. याउलट २०१० च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे ८४.६ टक्के होते.

iii) १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात भारतातील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत १८ टक्क्यांपासून ३१.२ टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढ झाली आहे. 

iv) भारताप्रमाणेच, 1960 त 2010 या पन्नास वर्षाच्या कालखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीतही ४७.१ टक्क्यांपासून ८४.६ टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढ झाली आहे.

v) भारतात १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली असल्याचे आढळते. 

vi) भारतात १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी-अधिक असल्याचे आढळून येते.

vii) ब्राझीलमध्ये १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली. 

viii) परंतु, ब्राझीलमध्ये १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकातील नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर हा क्रमशः घटत जाणारा आढळून येतो.

Previous Post Next Post