भारतातील वस्त्यांच्या वितरणाविषयी माहिती लिहा

भारतातील वस्त्यांच्या वितरणाविषयी माहिती लिहा

प्रश्न

 भारतातील वस्त्यांच्या वितरणाविषयी माहिती लिहा

उत्तर

 

 

i) भारतातील वस्त्यांचे असमान वितरण झाल्याचे आढळते. 

ii) हवामानातील भिन्नता, पाण्याच्या उपलब्धतेतील भिन्नता, जमिनीचा उतार व सुपीकता यांतील फरक या घटकांमुळे भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधांत विविधता आढळते.

iii) उदा., भारतातील गंगा, नर्मदा, गोदावरी इत्यादी नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत वस्त्यांचे केंद्रीकरण झाल्याचे आढळते. 

iv) याउलट, थरच्या वाळवंटी प्रदेशात पाण्याच्या अभावामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात.

v) भारतात उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात, पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात दाट वस्त्या आढळतात. 

vi) भारतात नर्मदेच्या खोऱ्याच्या प्रदेशात, विंध्य पठारावर व शेतीखाली असणाऱ्या भागांत केंद्रित वस्त्या आढळतात. 

vii) मध्य भारताच्या वनाच्छादित भागात, राजस्थानच्या पश्चिम व दक्षिण भागात, हिमालय पर्वतरांगांच्या उतारावर व उंचसखल व विखंडित प्रदेशांत विरळ व विखुरलेल्या मानवी वस्त्या आढळतात.

viii) भारतात नागरी वस्त्यांचे प्रमाण तुलनेने कमी व ग्रामीण वस्त्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आढळते.


Previous Post Next Post