आयुर्मान व सामाजिक प्रगती यांतील सहसंबंध स्पष्ट करा

आयुर्मान व सामाजिक प्रगती यांतील सहसंबंध स्पष्ट करा

प्रश्न

 आयुर्मान व सामाजिक प्रगती यांतील सहसंबंध स्पष्ट करा

उत्तर

 

 

i) देशाच्या सरासरी आयुर्मानातील वाढ देशातील सामाजिक प्रगती निर्देशित करते.

ii) आरोग्यसुविधांमधील वाढ, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, जीवनसत्त्वयुक्त सकस व पुरेशा प्रमाणातील उपलब्धता इत्यादी पोषक घटकांमुळे सरासरी आयुर्मानात वाढ होते. 

iii) विकसित देशांच्या तुलनेत, विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे. विकसनशील देशांतील सामाजिक व आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमुळे या देशांतील सरासरी आयुर्मानात हळूहळू वाढ होत आहे.

iv) भारतात १९६० साली सरासरी आयुर्मान केवळ ४१ वर्षे होते. परंतु २०१६ मध्ये सरासरी आयुर्मान ६८ असल्याचे आढळून येते. सरासरी आयुर्मानातील हो वाढ भारतातील सामाजिक प्रगती निर्देशित करते.

Previous Post Next Post