नियतकालिकांची व्याख्या, प्रकार व स्वरूप या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा

नियतकालिकांची व्याख्या, प्रकार व स्वरूप या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा

प्रश्न

 नियतकालिकांची व्याख्या, प्रकार व स्वरूप या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. 

उत्तर

 

 

अ) व्याख्या : i) ठरावीक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे 'नियतकालिक' होय.

ii) एकाच शीर्षकाखाली किमान एक आठवडा किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर सामान्यतः नियमितपणे प्रसिद्ध होणारे मुद्रित साहित्य म्हणजे 'नियतकालिक' होय.

ब) प्रकार : प्रकाशनाच्या कालावधीवरून नियतकालिकांचे साप्ताहिक, पाक्षिक मासिक, दुवैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक व वार्षिक असे प्रकार पडतात. 

क) नियतकालिकांचे स्वरूप : i) काही नियतकालिके संशोधनाला किंवा विशिष्ट विचारसरणीला बांधलेली असतात.

ii) काही नियतकालिके अर्थ, आरोग्य, कृषी, शिक्षण, उद्योग, धर्म अशा विशिष्ट विषयाला वाहिलेली असतात.

iii) सिनेसृष्टी, खेळ, साहित्य आणि मनोरंजन प्राधान्य देणारी ही नियतकालिके असतात.  

iv) भारतीय इतिहास व संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका अशी इतिहासाशी संबंधित नियतकालिकही प्रकाशित झाली आहेत.


Previous Post Next Post