आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट करा

आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट करा

प्रश्न

 आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट करा.

उत्तर

 

 

आकाशवाणी विविध कार्यक्रम प्रक्षेपित करीत असते.

i) भारताचा स्वातंत्र्यलढा, प्रधानमंत्री-राष्ट्रपती यांची भाषणे, पुण्यतिथ्या-जयंत्या असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. 

ii) ऐतिहासिक घटना, चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी ती इतिहासतज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते.

iii) ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे.

iv) राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचाच आधार घ्यावा लागतो. या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.


Previous Post Next Post