वृत्तपत्रांच्या इतिहासातील केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा

वृत्तपत्रांच्या इतिहासातील केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा

प्रश्न

 वृत्तपत्रांच्या इतिहासातील केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर

 

 

 स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक उद्देशांच्या पूर्तीसाठी जी वृत्तपत्रे सुरू झाली, त्यात 'केसरी' व 'मराठा' या वृत्तपत्रांचा समावेश होतो. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे १८८१ साली सुरू केली. या वृत्तपत्रांचे स्वातंत्र्यलढ्याच्या काळात महत्त्वपूर्ण योगदान आहे.

i) या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांत जागृती घडवून आणली. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली.

ii) तत्कालीन देशस्थितीवर प्रकाश टाकून सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर विचारमंथन केले. बालविवाह, पुनर्विवाह अशा विषयांवर मते मांडली.

iii) देशीभाषेतील ग्रंथ, पाश्चात्त्य ग्रंथ, विद्या यांवर चर्चा केली व त्यांतील विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

iv) एतद्देशीय आणि विलायतेतील राजकारण यांसंबंधी लेखन केले.

v) ज्ञानप्रसाराबरोबरच नीतिमूल्यांची जोपासना केली. 

vi) वाईट रूढीपरंपरांवर प्रखर टीका करून समाजप्रबोधन केले.

 


Previous Post Next Post