मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत

मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत

प्रश्न

 मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.


उत्तर

 

 

i) मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यांनुसार चालत असते.

ii) मेंदू, वृक्क, फुप्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली ज्ञानेंद्रिये - विशेषतः डोळे हे बहुमोल आहेत.

iii) या अवयवांचे कार्य बिघडले, तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते. 

iv) काही अवयवांची डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते. परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता कमी झाली, तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमोल म्हटले जाते.


Previous Post Next Post