अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात

अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात

 

प्रश्न

 अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात. 

उत्तर

 


) पूर्वीच्या काळी रोगजंतू पूर्ण मारून किंवा त्यांना अर्धमेले करून त्यांचाच लस म्हणून वापर केला जायचा.

ii) अशा लसी कधी कधी रोगाचा प्रादुर्भाव करीत असत. 

iii) परंतु आता जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरीत्या लस तयार होते. अशा प्रकारच्या लसीत रोगजंतूंचे जे प्रथिन प्रतिजन म्हणून काम करते, त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजन तयार केले जाते. याचा वापर लस म्हणून करण्यात येतो.

iv) तसेच जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या लसी अधिक तापस्थिर असतात व त्यांची क्षमता जास्त काळ टिकून राहते. यामुळे अशा लसी अत्यंत सुरक्षित असतात.


Previous Post Next Post