'उतराई' या कवितेतील राजकीय नेत्यांची धरण ही प्रतिमा स्पष्ट करा ?
किंवा
राजकीय व्यक्तींची समाजाप्रती असलेली उतराई स्पष्ट करा ?
उत्तर :
'उतराई' ही कविता गोविंद काळे यांची आहे. या कवितेमध्ये धरणातील पाणी हे चारी कालव्यात कितीही अडथळे मार्ग काढत शेताच्या बांधापर्यंत पोहंचते . त्याच प्रमाणे राजकीय नेत्यांनी धरण प्रतिमेचा आदर्श होऊन सामाजिक व राजकीय जबाबदारी सक्षमपणे पेलत समाजाप्रति उतराई झाले पाहिजे असा संदेश ही कवी या कवतेतून करतात.
एखादा राजकीय पुढारी नेता समाज कार्य करतो पण त्याला तेंव्हा कोणीच ओळखत नाही. असे -
"असशील कधी काळी तू
धरणात साठलेला जलाशय
शांत आणि खोलच खोल
नसेल कळली आम्हाला तुझी खोली आणि गती"
एखाद्या समुद्राचा अंदाज बांधता येत नाही कारण तो कधी शांत असतो तर कधी खवळतो तो किती खोल असेल हे सांगणे कठीणच आहे. अगदी राजकीय पुढारी व्यक्ती देखील जलाशया सारखेच असतो. त्यांचाही अंदाज सांगणे कठीणच आहे. येथे धरण व जलाशय ह्या दोन प्रतिमांचा कवी वापर करतो आणि राजकीय व्यक्ती हा देखील धरणाच्या पाण्यासारखे जीवन जगतो असे कवी म्हणतो.
"पण आज तू
कालव्यातून, चारीतून
उपचारीतून वाहताना
कधी खळाळतोस तर
कधी शांत शांत वाहतोस
सोबत घेतलेल्या कस्पटांनाही
दिशा देतोस नेहमी पुढे जाण्याची"
आज राजकीय पुढारी गल्ली ते दिल्ली पर्यंत फिरतांना दिसून येतात. निवडणूसाठी अगदी गावापासून प्रत्येक स्तरातील लोकांपर्यंत फिरतात. सोबत असलेल्या कार्यकर्त्याना नेहमी पुढे जाण्यासाठी मार्ग दशन करतात. जसे समुद्र, जलाशयात पाणी येण्यासाठी कालव्यातून, चारीतून, शांत वाहत कस्पटांना सोबत घेऊन शेवटी समुद्रालाच मिळते तसे राजकीय पुढारीचे जीवन आहे.
"तुझ्याबरोबर दोन्ही तीर आहेतच
अलीकडं तुझी समाजिक तळमळ
तर पलीकडं तुझी राजनिष्ठ जबाबदारी
तुझं हे नितळ वाहणं पाहून
मलाही वाटतं
ढासळून टाकावेत आपल्यातले
सगळे चढ"
राजकीय व्यक्तींनी दोन्हीबाजू सांभाळाव्यात एक म्हणजे सामाजिक तळमळ तर दुसरी म्हणजे राजकीय निष्ठा व जबाबदारी या दोन्ही बाबत आपली प्रतिमा स्वच्छ पाण्यासारखी असावी. आपल्यातील चढ-उतार, मत-भेद ढासळून टाकून समाजहीत व राजकीय जबाबदारी पार पाडावी.
"आणि बनावं उतार.... फक्त उतार
तुझ्यासाठी आसुसलेल्या शेतापर्यंत
तुला घेऊन जाण्यासाठी
तेवढीच उतराई !"
प्रत्येक राजकीय पुढारी व्यक्तींनी गावोगवचा विकास केला पाहिजे हीच त्यांच्या जीवनाची खरी उतराई आहे. पुढारी व्यक्तीची प्रतिमाही स्वच्छ पाण्यासारखी असावी.
थोडक्यात सर्वानी राजकीय नेत्यांनी धरण प्रतिमेचा आदर्श घेऊन सामाजिक व राजकीय जबाबदारी सक्षमपणेपेलत समाजाप्रती उतराई झाली पाहिजे असा संदेशही दिला आहे.