"माणसा इथे मी.." या गीतातून वामनदादा कर्डकांनी मानवतावादी विचार मांडला स्पष्ट करा ?
किंवा
वामनदादा कर्डकांनी आपल्या गीतांतून कशा प्रकारे मानवतावादी विचार कवीने मांडला ते लिहा ?
उत्तर :
वामनदादा यांचा जन्म नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यातील देशवंडी या गावी १५ ऑगस्ट १९२२ मध्ये झाला. 'माणसा इथे मी तुझे गीत व्हावे' हा रचना गीतप्रधान आहे. यातून मानवतावादी दृष्टीकोनातून विचार मांडला आहे. प्रस्तूत गीत हे "तुझे हित व्हावे" हे अत्यंत मालाचे गीत वाचकांनी मन:पूर्वक वाचावे अशी वामनदादाची मनापासून शिफारस होती. माणसाने कल्याण होईल असे गीत गाताना त्यांच्या मनातील सर्व कोंडमारा यातना, मानवतावादी विचार, माणसाच्या सर्वागीण "विकास व्हावा समाजातील मानवाला प्रतिष्ठा मिळावी, लोकांसाठी गाता गाताच मारायचे आहे. आणि हे मरणे हेच आपले जीवन आहे हा निर्धार वामनदादांनी केलेला आहे. या प्रेरणेनेच त्यांना माणसाने गाणे गायला शिकविले आहे.
"माणसा इथे मी तुझे गीत व्हावे
असे गीत गावे तुझे हीत व्हावे ||धृ||
असे गोड नाते तुझ्याशी जडावे
तुझ्या संकटाशी इथे मी लढावे ||१||
तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे
तुझे दु:ख सारे गळूनी पडावे ||२||
एकाने हसावे लाखोने रडावे
जुने सारे सारे इथे न उरावे ||३||
इथे सारे सारे नवे पेरताना
वामन परी मी तुझे हात व्हावे ||४||
भीमाचा हाच या प्रेरणेचा प्राण आहे. माणसांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी हे गीत गाईले आहे. माणसांनी माणसांच्या संकटामध्ये सहभागी व्हावे. मानवाला आलेली संकटे, दु:ख, भूक, सर्व गळून पडावे. माणसांनी मानवधर्म स्विकारावा असा आग्रह कवी, गीतकार वामनदादा कर्डक यांचा आहे. माणसाने मानवप्राप्ती जे सहकार्य करावे ते सहकार्य मानवाला नेहमी संकटात मदत करणारे असावे मानवाच्या सुख-दु:खामध्ये साथ देणारे असावे. जुने मानवी संस्कृती येथे टिकावी, नव्या जगाची नवे विचार पेरतांना माणसाने माणुसकी विसरू नये. कारण मानवी जीवन हे सुख-दु:खाचा संगम आहे. मानवाने नाते मानवाशी जडावे असे गीत गावे की तुझे हित व्हावे. शेवटी मानवाचे हित हाच माझ्या काव्याचा हेतू आहे. असे स्पष्ट वामनदादा कर्डक यांनी गीतातून सांगितला आहे.
थोडक्यात माणसा इथे मी तुझे गीत व्हावे | असे गीत गावे तुझे हित व्हावे" या गीतातून मानवतावादी दृष्टीकोनातून विचार मांडला आहे. माणसाच्या सुख-दु:खामध्ये माणसानी सहभागी व्हावे असे आव्हानही केले आहे.