ना धो महानोरयांनी सूर्यनारायणा या कवितेतून सूर्यनारायणाकडून कोणता आशावाद व्यक्त केला आहे

ना धो महानोरयांनी सूर्यनारायणा या कवितेतून सूर्यनारायणाकडून कोणता आशावाद व्यक्त केला आहे

ना.धो.महानोरयांनी 'सूर्यनारायणा' या कवितेतून सूर्यनारायणाकडून कोणता आशावाद व्यक्त केला आहे ?

किंवा 

मानव आणि पशू पक्षांच्या जगण्यातील अंधार नष्ठ होऊन त्यांचे जीवन शेतातील धान्याने सुखी व समृध्दी व्हावे याचे वर्णन स्पष्ट करा ?

उत्तर :

सूर्यनारायणाची कविता पानझड या काव्यसंग्रहातील आहे. प्रस्तुत कवितेत मानव आणि पशु पक्षांच्या जीवन सृष्टितील, जगण्यातील अंधार नष्ठ होऊन त्यांचे जीवन शेतीतल्या धान्याने सुखी व समृध्द व्हावे हा आशावाद ना.धो.महानोर सूर्यनारायणाला मागणी घालतो. 

"सूर्यनारायणा नित नेमानं उगवा 

अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. 

मोडक्या घराच्या बिंद्रावनाशी सांजेला 

दिव्याचा आधार जडो त्यांच्या संसाराला. 

ओजंळीनं भरू देगा पाखरांच्या चोंची 

दु:खत पंखांना असो सावली मायेची. 

आबादानी होवो शेत भरू दे दाण्यांचे 

तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबांचे. 

हे सूर्य नारायणा तुम्ही नित्य नेमाने दररोज उगवा, आणि मानवजातीतील व पशुपक्ष्यांच्या व संबंधजीव सृष्टितील अंधकार दूर करा. मोडक्या घराच्या ब्रिदावनांशी (चिन्ह) सांजेला. 

अशा परिस्थितील संसारला दिव्यांचा आंधार जोडा. 

जीव सृष्टितील पशुपक्षांना आणि मानवाला ओंजळीने भरभरून धान्य द्या. त्याच्या दु:खात तुम्ही सामावून जा. म्हणजेच दु:खात पक्षांना असो सावली मायेची. अशाप्रमाणे तुम्ही जीवसृष्टीवर प्रेम करा. त्यांच्या जगण्यातील अंधार नष्ठ करा. त्यांचे जीवन सुखी आणि समाधानी व्हावे. अशी विनंती सूर्यनारायणा तुम्हाला करतो आहे. शेतामध्ये भरभराटी होऊ दे. शेत भरून दाण्यांने जाऊ दे. आणि तुझ्या पालखीला शब्द तुकोबाचे असू दे. 

थोडक्यात सूर्यनारायणा या कवितेत, मानव आणि पशु पक्षी यांच्या जगण्यातील अंधार नष्ठ होऊन त्यांचे जीवन शेतातील धान्याचे सुखी व समाधानी व्हावे हा आशावाद ना.धो.महानोर सूर्यनारायणाकडून व्यक्त करतात. 


Previous Post Next Post