ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा

ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा

प्रश्न

 ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा

उत्तर

 

 

i) ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजख कडा इत्यादी घटक परिणाम करतात.

ii) विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उतरेकडील भागात तुलनेने अधिक आढळते. याउलट, ब्राझोलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते.

iii) ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे २५° से ते २८° से आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते. 

iv) ब्राझीलमधील अँमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी २००० मिमी, तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी १००० ते १२०० मिमी पर्जन्य पडते.

v) ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते. उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते. 

vi) अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

vii) ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. 

viii) ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते. हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश' किंवा 'अवर्षण चतुष्कोन' म्हणून ओळखला जातो.

Previous Post Next Post