बाहुल्यांच्या खेळाच्या पद्धती सांगून, या खेळाची माहिती लिहा

बाहुल्यांच्या खेळाच्या पद्धती सांगून, या खेळाची माहिती लिहा

प्रश्न

 बाहुल्यांच्या खेळाच्या पद्धती सांगून, या खेळाची माहिती लिहा.

उत्तर

 

 

i) बाहुल्यांच्या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा दोन पद्धती आहेत. राजस्थानी पद्धतीच्या बाहुलीला 'कठपुतळी' असे म्हणतात. या बाहुल्या प्रामुख्याने लाकडी असून त्यावर कापड व कातडे यांचा वापर केला जातो. दाक्षिणात्य बाहुल्या आकाराने मोठ्या असतात,

ii) राजस्थानी पद्धतीत ऐतिहासिक व्यक्ती व प्रसंगांवर भर असतो तर दाक्षिणात्य पद्धतीत पौराणिक प्रसंगांना प्राधान्य असते.

iii) लाकूड, लोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर बाहुल्या बनवण्यासाठी केला जातो.

iv) कठपुतळीचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. बाहुल्यांना काळ्या धाग्याने जोडून प्रेक्षकांना न दिसेल अशा पद्धतीने कलाकार बोटांच्या हालचालींनी बाहुल्यांना नाचवत असतो. सूत्रधार बोलेल त्याप्रमाणे बाहुल्यांची हालचाल नृत्य होते.

v) लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांचा कल्पकतेने वापर केला जातो. बाहुल्यांचे छाया-बाहुली, हात-बाहुली, काठी बाहुली व सूत्र-बाहुली असे प्रकार आहेत. 

vi) उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ अशा अनेक राज्यांत कठपुतळीचा खेळ कलावंत सादर करीत असतात.


Previous Post Next Post