भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल लिहा

भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल लिहा

प्रश्न

 भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल लिहा.

उत्तर

 

 

भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल पुढीलप्रमाणे झाली - 

i) चलत्चित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपटकलेचा जन्म झाला. १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावेदादा यांनी भारतात पहिला लघुपट तयार करून त्याचे प्रदर्शन केले.

ii) भारतीय चित्रपटांच्या विकासात दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर, दिवेकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे कारण त्यांनी परदेशी तंत्रज्ञांचे साहाय्य घेऊन 'पुंडलिक' हा कथापट तयार केला.

iii) पुढे दादासाहेब फाळके यांनी पूर्ण लांबीचा व सर्व प्रक्रिया भारतात केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला चित्रपट तयार केला. पुढे त्यांनी अनेक अनुबोधपटही तयार केले.

iv) आनंदराव पेंटर यांनी भारतात पहिला सिने-कॅमेरा तयार केला. त्यांचे मावस बंधू बाबुराव पेंटर यांनी ऐतिहासिक, सामाजिक असे अनेक चित्रपट तयार केले. भालजी पेंढारकरांनी चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार केला.

v) कमलाबाई मंगरूळकर या मराठीतील पहिल्या स्त्री-चित्रपट निर्मात्या, कमलाबाई गोखले या चित्रपटात काम करणाऱ्या पहिल्या महिला होत. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतूनही चित्रपटनिर्मिती झाली.

vi) प्रभात फिल्म कंपनीने अनेक धार्मिक, चरित्रपर, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपट तयार केले. बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रॉडक्शन, नवकेल आर. के. स्टुडिओज अशा कंपन्यांनी उत्तमोत्तम चित्रपट तयार केले. १९६१ ते १९८१ हा काळ भारतीय चित्रपटांचे 'सुवर्णयुग' मानला जातो.


Previous Post Next Post