मानवी उत्सर्जन संस्था माहिती

मानवी उत्सर्जन संस्था माहिती

मानवी उत्सर्जन संस्था माहिती

मानवी उत्सर्जन संस्था

मानवामधील उत्सर्जन 

मानवी उत्सर्जन संस्थेत वृक्काची जोडी, मूत्रवाहिनीची जोडी, आणि मूत्राशय यांचा समावेश होतो. रक्तातील टाकाऊ द्रव्य बाहेर टाकण्यासाठी वृक्कामार्फत मूत्र तयार केले जाते. 

उदराच्या पाठीमागील बाजूस कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या बियांच्या आकाराची वृक्के असतात. वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात. प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराचा, पातळ भित्तिका असलेला वरचा भाग असतो त्याला बोमन्स संपुट असे म्हणतात. त्यातील रक्तकेशिकांच्या समूहाला ग्लोमेरुलस असे म्हणतात. यकृतात तयार झालेला युरिया रक्तात येतो. जेव्हा युरियायुक्त रक्त ग्लोमेरूलसमध्ये येते त्यावेळी ग्लोमेरूलमधील रक्तकेशिकांमधून हे रक्त गाळले जाते. बोमन्स संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतरपदार्थाचे लहान रेणु छिद्रांतून बाहेर पडू शकतात. बोमन्स संपुटात असलेला द्रव नंतर नेफ्रॉन नालिकेमध्ये जातो. याठिकणी पाणी आणि उपयुक्त रेणूंचे पुन्हा शोषण केले जाते. उरलेल्या टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून मूत्र तयार होते. हे मूत्र मूत्रनलिकेमार्फत मुत्राशयात येऊन साठवले जाते. नंतर ये मूत्रोत्सर्जन मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. मूत्राशय स्नायूमय असून त्याच्यावर चेतांचे नियंत्रण असते. यामुळे आपण नेहमी मूत्र विसर्जन करण्यावर नियंत्रण ठेवू शकतो. मानवामध्ये वृक्क हा महत्त्वाचा उत्सर्जक अवयव असला तरी त्वचा आणि फुफ्फुस उत्सर्जनाच्या क्रियेत मदत करतात. 


Previous Post Next Post