मानवी पुरुष प्रजनन संस्था माहिती मराठी

मानवी पुरुष प्रजनन संस्था माहिती मराठी

मानवी पुरुष प्रजनन संस्था माहिती मराठी

वृषण व शिश्न हे मानवी पुरुष संस्थेचे प्रमुख अवयव आहेत. 

वृषण 

शुक्राणूंची (पुंयुग्मकांची) निर्मिती करते. 

शरीराच्या तापमानापेक्षा कमी तापमान, शुक्राणूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असते त्यामुळे वृषण उदरगुहेबाहेर वृषणकोशात असतात. 

वृषण, टेस्टोस्टेरॉन संप्रेरक स्रवते. हे संप्रेरक तारुण्यावस्थेत मुलांमध्ये बदल घडवून आणते. 

वृषणकोष 

येथे अपरिपक्व शुक्राणूं चा विकास व साठा केला जातो. 

शुकाणूवाहिनी 

या नालिकेद्वारे शुक्राणू, मूत्रोत्सर्गिके पर्यंत पोहोचतात.

शुक्राशय व प्रोस्टेट ग्रंथी 

शिश्नामार्फत बाहेर टाकला जाणारा द्रव (वीर्य) तयार करतात. वीर्य शुक्राणूंचे पोषण व शुक्राणूंच्या हालचालीस मदत करते. 

शिश्न 

पुरुष प्रजनन संस्थेच्या या भागाद्वारे फलनाच्या जागी शुक्राणूंचे वहन केले जाते. 

मानवी पुरुष प्रजनन संस्था आकृती 

शुक्राणू 

शुक्राणूपेशी तीन भागांनी बनते-डोके, मधला भाग व शेपूट. 

डोके जनुकीय माहितीचा साठा करते, मधल्या भागात ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक तंतुकणिका असतात तर शेपूट कशाभिकेसमान असून शुक्राणूस अंडपेशीपर्यंत पोहोचण्यास मदत करते. 


Previous Post Next Post