वनस्पती उत्सर्जन संस्था

वनस्पती उत्सर्जन संस्था

वनस्पती उत्सर्जन संस्था

वनस्पती उत्सर्जन संस्था माहिती 

वनस्पतींमधील उत्सर्जन 

वनस्पतींमधील उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यांमधील उत्सर्जनापेक्षा सोपी असते. वनस्पतीमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते. विसरण क्रियेद्वारे वायुरुप पदार्थ बाहेर टाकले जातात. वनस्पतींमधील बरेचसे टाकाऊ पदार्थ त्यांच्या पानातील रिक्तिका, फुले, फळे तसेच खोडाच्या सालीत साठवले जातात की जे अवयव नंतर गळून पडतात. इतर टाकाऊ पदार्थ राळ आणि डिंकाच्या स्वरूपात जीर्ण जलवाहिन्यांत साठवले जातात. वनस्पती त्यांच्या आसपासच्या जमिनीत काही टाकाऊ पदार्थ सोडतात. 

काही वनस्पतींमध्ये टाकाऊ द्रव्ये कॅल्शिअम ऑक्झलेटच्या स्फटिकांच्या स्वरूपात असतात. त्यांना रॅफाइडस असे म्हणतात. ते सुईच्या आकाराचे असल्यामुळे दुखापत करतात आणि त्याच्यामुळे खाज सुटते. 

वनस्पतींमधील काही टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहेत. उदा. रबराचा चिक, डिंक, राळ किंवा निलगिरी व चंदनाचे तेल. 


Previous Post Next Post