चांदणभूल या ललित लेखसंग्रहातील लेखकाची संवेदनशिलता स्पष्ट करा

चांदणभूल या ललित लेखसंग्रहातील लेखकाची संवेदनशिलता स्पष्ट करा

चांदणभूल या ललित लेखसंग्रहातील लेखकाची संवेदनशिलता स्पष्ट करा ?

उत्तर  

"चांदणभूल" हा ललितलेख संग्रह विजयकुमार मिठे यांचा आहे. या ललितलेखसंग्रातील 'चांदणभूल' या लेखातून निवेदकाची संवेदनशीलता दिसून येते. निवेदक हा लहानपणापासून चांदोबा, चिऊ, कावुची गोष्टी ऐकूण पक्षांचा व निसर्गाची ओळख करून घेतो. त्यामुळे त्याला आजतागायत पक्षांचा, निसर्गाचा, चांदोमामाचा, चांदण्याच्या आभाळाचा लळा लागतो. 

लेखक, चोेथी-पाचवीलाच असताना शेतामधील खळ्याचे काम पाहण्यासाठी आपल्या चुलत्याबरोबर शेतामध्ये रात्री जागलिच्या मुक्कामास जातो. शेतामध्ये गव्हाच्या पेंढया, गव्हाचे पाथरे राखण्यासाठी शेतामध्ये कुणी ना कुणी शेतात सोबत गावकुत्रापण असायचा. तात्या खेडमेढीवर ठेवलेला 'झोऱ्या' गव्हाच्या पाथऱ्यावर अंथरायचा, कंदिलाची वात बारीक करून खेडमेटीला टांगायचा आणि झोपी जायचा मी मात्र रात्रीउशीरा पर्यंत चांदण्याचे निरीक्षण करून झोपी जात होतो. 

चंद्रावरील शतलप्रकाशा पेक्षा त्यावर काळे डाग कशाचे आहेत. याचे कुतूहल वाटत होते. बालपणी पाहिलेले चंद्रावरचे हे काळे डाग आजही तसेच आहेत. एखाद्या पोरानं एकच सदरा रोज रोज वापरावा तसा चांदोमामा एकच अंगरखा घालून वर्षानुवर्षे फिरत आहेचंद्राच्या बाजूला कांही अंतरावर राखून चमकणाऱ्या ठळक चांदणीकडे पाहिजे की, चांदोबाची बायको असावी असे वाटते. कारण ती चांदणी सतत त्याच्या सोबत राहते. आभाळातल्या या चांदण वैभवाबद्दल त्याला तीन चांदण्यांना तीकांड, चार चांदण्यांना बाज चांदण्यांच्या दाट पुंजक्यांना विंचू आणि पहाटेला उगवणारा तारा त्याला 'सुक' असे पूर्वपरंपार चालत आलेली नांवे विलक्षण वाटतात. 

खळ्यावर दिवसभर मळणीचे काम चालायचे, उन्हामध्ये तापलेल्या पाथऱ्यावर बैलाची पात हाकल्याने त्यांच्या पायाखाली चुरलेल्या कणसातून दाणे मोकळे व्हायचे. तिसरा प्रहारपर्यंत उपणणीसाठी 'मदन' तयार करायचे, रात्री उपणवर करायचे वारा आला की भुसा वाऱ्याने पुढे जाऊन तवईपाशी धान्याची रास जमा होत होती. वारा गेला की, सर्वजण जेवण्यासाठी एकत्र बसायचे मी मात्र ताटीतील वाढलेल्या दुधामध्ये चंद्राचे रूप पहात बसायचे आणि पुन्हा भाकरी चुरून खायचो ही प्रथमपूरषी निवेदन पध्दती दिसून येते. पणाने सांगतो, निसर्ग, चांदोबा, चांदण्या, शेतातील खळे, गावगाड्याचे वर्णन करतो. घराच्या पाठीमागे नऊखणाची ऐेसपैस जागा तेथे गच्ची होती. त्या गच्चीच्या अगदी जवळ गुलाबमामुचा अंगणातला पांढरा चाफा उन्हाळ्यामध्ये फुलांनी डवरून गेला आहे. नदीच्या बाजूला उगवलेला चंद्र हळू हळू मातंगवाड्यातल्या लिंबोणीच्या झाडावरून वर वर सरकताना दिसत आहे. 'लिंबोणीच्या झाडामागं, चंद्र झोपला ग बाई' या रेडिओवरील गाण्यांचा उद्देश म्हणजे लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र निवांतपणे झोपला आहे असे कुठेही दिसून येत नाही. हा विरोधाभास आहे असे निवेदकाला वाटते. 

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्व गावातील लोक घराच्या बाहेर झोपलेली आहेत. चांदण्यांनी भरलेल्या आभाळाकडे पाहत अंगणात कुजबुज चालू असते. चंद्राकडे पाहून चंद्र आपल्याशी संवाद करतो का ? हसतो का ? असा भास होतो. चंद्र-चांदण्यांनी भरलेल्या आभाळातून चारदोन काळे पांढरुके ढग चंद्राजवळून जाताना दिसायचे जणू काय काळे-पांढरे ढग चंद्राशी लपंणडाव खेळतात असे चित्रे आभाळात उभे राहते. रात्री पिकांना पाणी देतांना चंद्र माझ्यासोबत जिकडे पाणी जाईल तिकडे तो सोबतच येतो. याचे विलक्षण नवल निवेदकाला वाटत होते. रात्रीच्या वेळी अंगणात, खळ्यात जो कोणी झोपलेला असेल त्याला चांदण्यांनी भरलेल्या आभाळाने वेड लावले होते. हे चांदण्यानी भरलेल्या आभाळातल्या तीकांड, बाज, इच्चू, सुक यांच्याकडे पाहून वेळ किती झाला हे सहज सांगत होते. या गोष्टीचे खूपच आश्चर्य वाटत होते. 

आकाशातील लुकलुकणारा तारा तुटताना पाहणे ही अपशकुन असतो असे आईन मार देऊन सांगितले, तेंव्हा पासून माझ्या मनाला प्रश्न पडतो की, तारा तुटण्याचा आणि माणूस मृत्युमुखी पडण्याचा काय संबंध आहे. दुसरी बाजू म्हणजे एका कवीने तूटत्या तारा पाहून त्या ताऱ्याकडे एक मागणी घालतो हे सत्य की आई अपशकुन म्हणते ते सत्य अशा अवस्थेत निवेदक अडकला आहे. 

बालपणापासून-तारुण्यातही आणि आज निवेदकाला साठवर्ष झाली तरी तो आकाशातील तारा अजूनही तुटतो आहे. तीकांड, बाज, इच्चू, सुक आहे तिथेच आहे त्यामुळे आईची गोष्ट ही अपशकुनाची खोटी ठरते. चंद्र व चांदणी आणि तारा यांचा मानवाच्या मृत्युशी कांहीच संबंध नाही. हे निवेदकाच्या लक्षात येते. 


Previous Post Next Post