झेल्या ही कथा शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील भावबंध उलगडून दाखविणारी आहे स्पष्ट करा

झेल्या ही कथा शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील भावबंध उलगडून दाखविणारी आहे स्पष्ट करा

 शिक्षणव्यवस्थेती एका रागीट गुरुजीमुळे बाहेर पडणाऱ्या मुलांचे भावविश्व आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्यानंतर मुलांचे होणारे परिवर्तन 'झेल्या' या कथेद्वारे स्पष्ट करा ?

किंवा 

शिक्षणव्यवस्थेतील प्रेमळ गुरुजींच्या स्वभावाने 'झेल्यामध्ये' घडून येणारे परिवर्तन थोडक्यात लिहा ?

किंवा 

'झेल्या' ही कथा शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील भावबंध उलगडून दाखविणारी आहे स्पष्ट करा ?

उत्तर 

'झेल्या' ही कथा व्यंकटेश माडगूळकरांच्या 'माणदेशी माणसं' या कथा संग्रहातील आहे. प्रस्तूत कथेतून शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील भावबंध उलगडून दाखविणारी आहे. शिक्षणव्यवस्थेतील रागीट शिक्षकामुळे शिक्षणव्यवस्थेपासून दुरावलेल्या 'झेल्याचे'परिवर्तन एका प्रेमळ शिक्षकामुळे बदलते. याचे वर्तन या कथेत आले आहे. 

एक शिक्षक दुसऱ्या रजेवर गेलेल्या शिक्षकाच्या जागी तात्पुरत्या कालावधीसाठी शाळेत शिकवायला येतात. या नवीन आलेल्या शिक्षकाच्या लक्षात येते की, 'झेल्या' नावाचा विद्यार्थी शाळेत येत नाही. तो उनाडक्या करीत चिंचा पाडणे, म्हेेस घेऊन ओढ्याभोवती फिरणे, अशी गावात कामे करत फिरतो. हे शिक्षक त्याला गोडी गुलाबीने शाळेत बोलावतात. शाळेतील काही विद्यार्थी झेल्याला उचलून घेऊनच येतात. तेंव्हा शिक्षक झेल्याची विचारपूस करतात. तेव्हा शिक्षकाच्या पूर्वपणे लक्षात येते कि हा मुलगा खोडकर, उनाडक्या जरी करीत असला तरी त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता, रागीट स्वभाव, क्रांतिकारी विचारप्राणली, बोलण्यातील नम्रपणा, त्याची परिस्थिती संपूर्ण शिक्षकांच्या लक्षात येते. 

'झेल्याचे' सर्व मानसशास्त्र जाणून झेल्याला योग्य घडविण्यासाठी शिक्षक प्रयत्नशीलपणे त्याला हाताळतात. झेल्याला गुरुजीचा प्रेमळपणा व स्वभाव आवडल्यामुळे शाळेची गोडी लागते. गुरुजींच्या प्रेमळ स्वभावामुळे ते शिक्षक त्याला आपलेसे वाटतात. शिक्षक व विद्यार्थी यांची मेेत्री जुळून येते. शिक्षक सामाजिक व राजकीय परिस्थितीमुळे व नोेकरी आपली कायम नसल्यामुळे उदासीनमध्ये जीवन जगतात. एकलकोंडी वृत्तीमुळे जीवनात नेेराश्य येते. अशी खंत मनामध्ये व्यक्त करतात. परंतु विद्याथ्र्यावरील अफाट प्रेम व ज्ञान यामुळे त्यांना आंदनही होतो. अशा अवस्थेमध्ये झेल्या शिक्षका सोबतच राहण्यास येतो. शिक्षकांची सर्व कामे प्रमाणिकपणाने करतो. संध्याकाळी त्याला पडलेल्या प्रश्नांची गुरुजीकडून उत्तरे घेतो. पण झेल्याने प्रश्न गुरुजींना थक्क, विचार करायला लावणारी होती. त्यामधून झेल्याचा क्रांतीकारी स्वाभाव, निडरपणाची भूमिका, समाजसेवकांची भूमिका दिसून येते. 

'झेल्या' आणि गुरुजींची मेेत्री अतूट बंधनासारखी घट्ट बनली होती. पण गुरुजी रागट गुरुजींच्या येथून जावे लागणार यामुळे गुरुजीच्या तीन महिन्याच्या बदलीसाठी असल्यामुळे गुरुजींना येथून जावे लागणार यामुळे गुरुजींला व झेल्यांला खूप दु:ख होते. गुरुजी त्यांच्या गावी जायला निघतात. जालिंदर (झेल्या) त्यांच्या मार्गावरच असतो. ते जायला निघल्यावर हाही मागे मागे जातो. तो गुरुजींना विनंती करतो की, गुरुजी मलापण तुझ्याबरोबर घेऊन चला. पण शिक्षकही अगतिक असतात. कारण व्यवस्थेमुळे तेही दुष्काळी मुलखातले असतात. परिस्थितीने ते हतबल झालेले असतात. म्हणून ते झेल्याला परत माघारी जायला सांगतात. झेल्या रडत रडत पुन्हा गांवी येतो. त्या दोघांची कायमची ताटातूट होते. असा शोकात्मक शेवट कथेचा होतो. 

थोडक्यात शिक्षणव्यवस्थेमुळे एका शिक्षकांच्या रागीटपणाला कंटाळून आपल्या शिक्षणावर पाणी सोडणाऱ्या मुलांचे एका प्रेमळ शिक्षकांमुळे त्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्याच्या मानवीवर्तनाचा अभ्यास करून त्याला दिलेले शिक्षण ही त्याच्या भाविष्याची शिदोरी असत. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांचा भावसंबंध किती घनिष्ट प्रकारचा असतो. हे कथेतून प्रकर्षाने जाणवते. 

Previous Post Next Post