झेल्या या कथेचे कथानक थोडक्यात लिहा

झेल्या या कथेचे कथानक थोडक्यात लिहा

'झेल्या' या कथेचे कथानक थोडक्यात लिहा ? 

किंवा 

'झेल्या' ही व्यक्तीरेखा तुमच्या शब्दात लिहा ?

उत्तर 

माणदेशातील निंबवले गावाच्या खेड्यात राहणारा जालंदर एकनाथ लोहार म्हणजे 'झेल्या' हा लोहराचा तेरा-चोेदा वर्षाचा एक मुलगा आहे. या गावात (लेखक) जेव्हा तीन महिन्यासाठी मराठी दुसरी व तिसरीच्या वर्गाला शिकवण्याची शाळेतील नोकरी करत होते. तेंव्हा झेल्याची त्यांच्याशी ओळख होते. ती ओळख कशी कधी होते आणि झेल्या त्यांच्या मनात कसे घर करतो हे लेखक 'झेल्या' या व्यक्तिचिंत्रातून सांगतात. 

निवेदक (मास्तर) शाळेच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी समोर बसलेल्या मुलांवर नजर फिरवून हजेरी घेतात. मुले हजेरी सांगतात. मराठी दुसरीच्या वर्गात एकूण बारा मुले असतात. 

शेवटचे नांव असते जालंदर एकनाथ लोहार त्याचे नांव पुकारताच 'गेेरहजर' मास्तर असा एकच गलका असतो. अनेक दिवस झाले तो शाळेत येत नाही. अशीही माहिती मुले देतात. हजेरीत त्याच्या नावापुढे फुल्याच असतात. का येत नाही हा शाळेत ? असे विचारल्यावर 'कुणाला ठाव मास्तर' असे एकजण म्हणतो 'वाड्यात चिंचा पडतोय'  असेही एक मुलगा सांगतो. तीन दणगट मुलांना निवेदक त्याला बोलवायला पाठवतो. खेड्यातील शाळेतील ही एक पद्धतच असते. मुलगा गेेरहजर असेल तर त्याला बोलावून घेऊन चांगले मारायचे. पुन्हा गेेरहजर राहिल्यास उलटा टांगीन असा दम द्यायला. पंधरा मिनिटांतच मुले जालंदरला घेऊन येतात. टो वाड्यात नेहमीप्रमाणे चिंचा पाडत असतो. मुले त्याला शाळेत चलायला  सांगतात तेंव्हा तो त्यांना शिव्या देतो. एकही बटन नसलेल्या कुडत्यांला एक हाताने गळ्याशी घट्ट पकडून जालंदर उभा असतो. निवेदक त्याच्याकडे एकबार बघतो. डोक्यावर मळकट पांढरी टोपी, अंगात कारलेततरी डाग पडलेल्या मळलेल्या बाहीवर ठिगळ लावलेला कुडता, तांबड्या रगाची चोेकटीची गादीपाटाची चड्डी झेल्याचा वेश असतो.

झेल्याच्या चड्डीचे दोन्ही खिसे चिंचाभरल्याने फुगलेले असतात. शाळेत का येत नाहीत ? असं विचारल्यावर तो काम असते घरी, असे उत्तर देतो. त्याचे किडलेले काळे दात निवेदकाच्या नजरेतून सुटत नाहीत. म्हेेस हिंडवावी लागते. भाता ओढावा लागतो आणि वडील शाळेत जाऊ नकोस असे म्हणतात. असे एक झटक्यात झेल्या सांगून टाकतो, झेल्याच्या या सबबबी खोट्या असे असतात. कारण न्हाव्याचा सदा खरे काय ते सांगतो. झेल्या कांहीही काम करीत नाही. गावात उनाडक्या करतो. बापाचे ऐकत नाही. सदाने असे खरे सांगताच 'शाळे बाहेर आलास की जीव घेतो' असे झेल्या चिडून म्हणतो. 

झेल्याच्या उनाडपणा, गुंडगिरी त्याच्या वागण्या-बोलण्यातून सतत दिसते. अंगातल्या मळकट कपड्यावरून बेफिकीरी दिसते. परंतु मास्तरांसमोर तुटलेल्या बाटणांच्या कुडता गळ्याशी घट्ट धरलेला झेल्या कुठेतरी दुरावलेला, मास्तरांची भीती बाळगणारा वाटतो. आता हे मास्तर आपल्याला बडवणार अशी तयारी झेल्याची झालेली असते. पण 'काम असेल तर तेवढ्यापुरते विचारून जावे' असे त्यांचे मवाळ शब्द कानी पडल्यावर झेल्या गोंधळून जातो. खिशातल्या चिंचा मुकाट्याने टेबलावर काढून ठेवतो. हळूहळू नियमित शाळेला येऊ लागतो. आपण गेेरहजर राहिलो तरी मास्तरांनी मारले नाही. याचा तो परिणाम असतो. शाळेत कितीही खोड्या काढल्या, वात्रटपणा केला तरी मास्तर नसतेच हसतात. हळूहळू झेल्या मास्तरांचा पट्टशिष्य बनतो. 

शाळेच्या मागच्या बाजूला एक छोटी अंधारी खोली असते. त्यातच मास्तर राहत असतात. सकाळी उठून ओढ्यावर जाऊन अंघोळ करून एक कळशी पाणी पिण्यासाठी खोलीत घेऊन जायचे. चहा करून प्यायचा, दुपारी भात करून खायचे रात्री तोच खायचा असे दिनक्रम त्यांचा असतो. उदास झाल्यानंतर चिमणीच्या प्रकाशात काहीतरी वाचतो. याच काळात झेल्या मास्तरांचा साथीदार बनतो. त्यांच्या खोलीत झोपायला जाऊ लागतो. त्याच्या बालबुध्दीला पडलेले प्रश्न ऐकून त्यांची उत्तरे देताना मास्तरांच्या जीवाला थोडा विरंगुळा वाटू लागतो. 

झेल्या कधी सुभाषबाबूविषयी विचारी तर कधी नाना पाटलांविषयी विचारी, त्याला धाडसी माणसे आवडतात. थंडीचे कधी तरी आपण बिड्या ओढतो हे टो नकळतपणे मास्तरांबरोबर बोलून जातो. हळूहळू तो मास्तरांना मदत करू लागतो. काटक्याकुटक्यांची मोळी आणतो, सारवणे, पाणी भरणे, भांडी घासणे, बाजार करणे असे मास्तरांचे पडेल ते काम झेल्या करू लागतो. एवढे करून पुन्हा तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवतो. 

मास्तरांचे तीन महिने संपतात. ज्यांच्या जागी ते बदलीचे मास्तर म्हणून रुजू झालेले असतात ते मास्तर पुन्हा येणार असतात. हे झेल्याला कळताच 'मी येतो मास्तर तुमच्या संगे ?' असे तो म्हणतो. तालुक्याच्या गावी जाणार आहे असे खोटेच मास्तर त्याला सांगतात. सर्वाना भेटून मास्तर निघतात. त्यांची एक पिशवी हातात घेऊन झेल्याही त्यांच्याबरोबर कडेकडेने चालू लागतो. गावाचा ओढा ओलांडून मास्तर थांबतात. झेल्याला परत सांगताच झेल्या त्यांच्या गळ्यात पडून रडतो. बाहीने डोळे पुसत पुसत परत गावाकडे निघून जातो. मास्तर आपल्या वाटेने निघून जातात. 

थोडक्यात मास्तरांवर जाल्या नकळत जीव जडवतो. त्याच्या मनातली प्रेमाची भूक त्यावर दिसते. माडगूळकरांची झाल्याचे व्यक्तिचिञ जिवंत उभा केले आहे.

Previous Post Next Post