लेनिनचे नवे आर्थिक धोरण स्पष्ट करा

लेनिनचे नवे आर्थिक धोरण स्पष्ट करा

लेनिनचे नवे आर्थिक धोरण स्पष्ट करा. 


उत्तर 

लेनिनचे नव्या आर्थिक धोरणांची घोषणा केली. त्यामध्ये काही प्रमाणात खाजगीकरण व काही प्रमाणात राष्ट्रीयीकरण कायम ठेवण्यात आले. खाजगी उद्योग, खाजगी व्यापार व खाजगी मालमत्तेला विशिष्ट मर्यादेपर्यत मान्यता दिली. लेनिनच्या या धोरणाला कट्टर साम्यवादी नेत्यांनी विरोध केला. 'तीन पावलेपूढे गेल्यानंतर अडचणी आल्यास दोन पावले मागे जाण्यास सुज्ञपणा असतो'. अशा शब्दांत लेनिनचे आपल्या नव्या आर्थिक धारणाचे समर्थन केले. 

नव्या आर्थिक धोरणांमुळे कृषी व ओेद्योगिक उत्पादनांत प्रचंड वाढ झाली. पूर्वीपेक्षा अधिक जमीन लागवडीखाली आली ओेद्योगिक क्षेत्रात थोड्या प्रमाणात खाजगी उद्योगांना परवानगी देण्यात आली. उद्योगांना मालाची खरेदी-विक्री खुल्या बाजारात करण्याची मुभा देण्यात आली. दळणवळण व परराष्ट्र व्यापार मात्र पूर्णपणे सरकारच्या ताब्यात होता. नव्या आर्थिक धोरणामुळे ओेद्योगिक क्षेत्रातील उत्पादनालाही झपाट्याने गती मिळाली. एका महान क्रांतीकारक व जगातील पहिल्या साम्यवादी राज्याचा संस्थापक म्हणून लेनिनने केलेले कार्य जगाच्या इतिहासात निश्चितच नेत्रदिपक व अतुलनीय आहे. 

Previous Post Next Post