साम्राज्यवादाचे कोणतेही तीन इष्ट परिणाम लिहा

साम्राज्यवादाचे कोणतेही तीन इष्ट परिणाम लिहा

साम्राज्यवादाचे कोणतेही तीन इष्ट परिणाम लिहा.


उत्तर 

1) भौतिक सुधारणा : युरोपियांनी वसाहतीवर आपला अंगल राखण्यासाठी काही सुधारणा केल्या, सैन्याच्या जलद हालचालीसाठी व अंतर्गत दळणवळणासाठी रस्ते, रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे, विमाने, कालवे इ. सोयी उपलब्ध केल्या. या भौतिक सुधारणांचा जसा पाश्चात्यांना कायदा झाला तसा तेथील जनतेला झाला. लोक इतकमेकांच्या जवळ येऊन यांच्यात वैचारिक देवाण - घेवाण सुरू झाली. 

2) शिक्षणाचा प्रसार : साम्राज्यवादी राष्ट्रांनी आपल्या व्यापाराच्या भरभराटीसाठी व धर्मप्रसारासाठी काही ठिकाणी मानवतावादी दृष्टीने शिक्षणाला चालना दिली पाश्चात्य राष्ट्रातील शिक्षणांचे वारे वसाहतीतही वाहू लागले. आपल्या देशातुन वसाहनीतील कारभार चालविण्यासाठी लोकांना आणण्यापेक्षा स्थानिक लोकांनाच शिक्षण देऊन कारकून बनविण्याचा यांचा प्रयत्न होता. त्यातुनच वसाहती शिक्षणाचा प्रसार होत गेला

3) वैचारिक परिवर्तन : जगाच्या कानाकोपयातील विचार एकमेकांना समजू लागले. वसाहतीतील लोक युरोवियनांच्या संपर्कात आल्यानंतर पाश्चात्यांच्या नवीन विचारांचा प्रभाव त्याच्या वर पडला. पाश्चात्य राष्ट्रानीच नव्या कल्पना, शस्त्र, विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य, कायदा, राज्यपध्ददी यांची ओळख या लोकांना करून दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवादू 'समाजवाद, साम्यवाद, लोकशाही या प्रगत विचारांनी ओळख वसाहतीतील लोकांना झाली. समाजसुधारक, धर्मसुधारक, विचारवंत यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा नाहीशा करून पुरोगामी विचार रुजविल्याचा प्रयत्न केला. 


Previous Post Next Post