दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम लिहा

दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम लिहा

दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम लिहा. 


उत्तर :

पहिल्या जागतिक महायुद्धापेक्षाही दुसरे जागतिक महायुध्द विस्तारित क्षेत्रात झाले. या महायुद्धात अणुबॉम्बचा तसेच आधुनिक शस्त्रास्त्रांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. त्यामुळेच या महायुद्धाचे परिणाम जगातील मानवाच्या सर्वागीण जीवनावर झाले. दारूगोळ्याचा अति वापर झाल्याने त्याचे परिणाम दीर्घकालीन आहेत या महायुद्धाचे प्रमुख परिणाम पुढीलप्रमाणे. 

1) प्रचंड जिवित व वित्त हानी :

पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध जास्त विध्वंसक होते. महायुद्धाच्या या सहा वर्षाच्या कालखंडात केवळ रणांगणावर सुमारे दीड कोटी सैनिक मारले गेले. इतरत्र मरण पावलेली माणसे व जखमी, अनाथ, अपंग लोकांची संख्या वेगळी होती. या युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांचा लष्करी खर्च १५१७ अब्ज डॉलर्स इतका प्रचंड होता. माल मत्तेची हानी याच्या दुप्पट होती. सार्वजनिक बांधकामे, घरेदारे, शेती, दवाखाने, कारखाने, धरणे, इमारती इ. चा इतका विध्वंस झाला की अनेक पिढ्या हे नुकसान भरून काढू शकले नाही. 

२) आर्थिक परिणाम :

एवढ्या मोठ्या प्रमाणात जिवित व वित्तहानी झाल्यामुळे जगातील सर्वच राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोलमडली सामान्य माणसाच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या. युद्ध संपल्यावर त्यांच्या हालअपेष्टा कमी होण्याऐवढी वाढल्या. चलनवाढ, महागाई, टंचाई, रोगराई, दुष्काळ, काळाबाजार इ. गोष्टी नेहमीच्या जीवनाचे अंग बनले. कापड, ओेषधे, अन्न, कोळसा, इंधन यासारख्या गोष्टींच्या तुटवडा निर्माण झाला. सर्वसामान्य लोकांची अवस्था फार दयनीय झाली. 

Previous Post Next Post