सये तुझे डोळे कथेचे कथानक थोडक्यात लिहा

सये तुझे डोळे कथेचे कथानक थोडक्यात लिहा

'सये तुझे डोळे' मधील जयराम व त्याची पत्नी कमला यांच्या जीवाची होणारी घुसमट थोडक्यात लिहा ? 

किंवा  

'जयराम व कमल यांची संसारिक घालमेल थोडक्यात लिहा' ?

किंवा 

'सये तुझे डोळे' कथेचे कथानक थोडक्यात लिहा ?  

उत्तर

'सये तुझे डोळे' ही एक लघुकथा असून भारत सासणे यांच्या 'जॉन आणि अंजिरी पक्षी' या लघुकथा संग्रहातून घेतली आहे. प्रस्तूत कथेमध्ये जयराम व कमला यांच्या कोेटूंबिक जीवनाची व्यथा मांडली आहे. जयराम या कथेला नायक आहे. जयरामाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती, कारण संयुक्त कुटुंब पध्दतीमध्ये काम करणारा एकटा आणि खाणारी जास्त माणसं होती त्यातून आजून वडिलांची दुसरी बायको म्हणजे जयरामची सावत्र आई ही जयरामच्या घरीच येऊन राहते आणि वडिलांनी घरावर घेतलेले कर्ज सात-आठजण एकाच कुटूंबात बहिणीचे शिक्षण, सावत्रभावाचे शिक्षणासाठी लागणारा पैसा आणि घरसंसार यामुळे उदासीनता जीवनात आलेली दिसून येते. त्यामध्ये जयरामचे लग्न नवीनच झाले होते. मोठा भाऊ या उद्देशाने सर्व कुटूंबाची जबाबदारी जयरामवरच येते. 

जयराम काम करण्यासाठी बाहेर जातो. दिवेलागण झाले तरी तो आला नाही. त्याची वाट मात्र फक्त कमला (पत्नीच) पाहते. आई (अक्का) पोथी वाचन करत राहते. जयरामच्या बहिणी पायऱ्यांवर बसून गप्पा मारीत होत्या. मनोरमा दहावीला होती आणि दुसरीने शाळा सोडली होती. दोघींच्या गप्पा सिनेमाच्या चालू होत्या. तिने साजन सिनेमा पाहिला होता, फीसच्या पैसातून, दोघी मी आल्याचे पाहून गप्प झाल्या. बहिणीवर राग व्यक्त करताना जयराम म्हणतो की, तुझी परीक्षा कधी आहे मने ? कशाला गप्पा मारता सिनेमाच्या, धाकटी निसटून गेली. 

जयराम सावत्रआईच्या तब्येती बद्दल विचारले. त्याने एकदा रागाने मनोरमेकडे पाहिजे. कारण ती आईला चिटकून बसली होती. तो दांभिकपणा त्याला आवडला नाही. त्या क्षणाचा तीव्र राग त्याला येतो. अक्का पुढे म्हणाली, कामाचे काय झाले. यावर जयरामने उत्तर दिले सावकारचा हप्ता शंभर रुपये भरला. अक्का आंधळी असल्यामुळे तिला दिसत नाही व्यवस्थीत तरीही अक्काने सावकारचे कर्ज भरलेले पावती मागितली एवढा विश्वास माझ्यावर नाही का ? असे जयराम आपल्या बायको (कमलीजवळ) जवळ व्यक्त करतो. चेहऱ्यावरचा राग जाऊन अगतिकता आली होती. मनोरमाने कुलूप उघडून पावती पेटीत ठेवली.

त्याची बायको (कमल) ओट्याला टेकून उभी होती. दोन वर्ष लग्नाला झाली होती. अगोदरची कमला टवटवीत होती. प्रसन्न होती. पण आता मात्र स्वयंपाकघराच्या धुरकटलेल्या ओघळत्या छपराखाली उभी असताना ती अपरिचीत, परकी वाटत होती. तिची टाॅनिकची बाटली संपून महिना झाला तरी तिला वाटली आणण्यासाठी पैसे उरत नाहीत. तिने मला एकदम अपराधी नजरेने पाहिले पण कमल तशी नव्हती. फक्त तिचे डोळे हे सोशिक वाटले. मला नेहमी संसारामध्ये साथ देणारी होती.

अप्पा कर्ज ठेवून निघून गेले. कोणावरही विश्वास ठेवून कर्ज काढले . वर तर मिळाले नाही. मात्र कर्जाचा बोजा ठेवून गेल्यामुळे त्यांची बायको वेडी झाली होती. घरामध्ये कांहीही झाले तरी जयराम मात्र वडिलांच्या फोटोसमोर उभा राहून खिडकीतून समोरची एकुलती एक चांदणी पाहत सर्व दु:ख विसरून जातो. पण कर्तव्य म्हणून त्याने सर्व जबाबदारी घेतली होती. सावत्रआईचे तीन मूल एकत्र कुटूंब असल्यामुळे सावत्रआई कमला घर फोडेल त्यामुळे ते वेगळे राहतील. नवऱ्याने कर्ज काढलेले कधीच फिटणार नाही अशी भावना अक्काची होती. पण तसे काही कमलाने केले नाही. 

जयराम एकटा का वावरतो घरामध्ये याचे निरीक्षण कमला करत होती. कर्ज फेडण्याच्या या दिवशी हे घरामध्ये प्रतिमहिन्याला होत असे. घरामध्ये उदासिनतेने वातावरण, चिडचिडेपणा, जीवघेणी शांतता आणि जयरामची कमलाप्रती भावना तिने मला फक्त साथ द्यावी अशी होती. मनोरमाच्या स्नेहसंम्मेलनासाठी तिने आरशाकडे पाहून नटापट्टा करत होती; पण तिला घालण्यासाठी चांगला ड्रेस नाही याची खंत जयरामला वाटते. रंगीत साड्या, कपडे घालून मुली स्नेहसंम्मेलनासाठी जमतील आणि मनोरमाकडे व्यवस्थित कपडे देखील नाहीत याचे खुप वाईट वाटते जयरामला. जयरामला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते डोळ्यांतली काळजी, चिंता, मवाळ जेष्ठपण याची खात्री त्याला होते. मनोरम आणि मनोहरचे शिक्षण, कुटूंबातील सर्वस्वी जबाबदारी आणि तूटपुंजा पगार यामुळे जयरामाची अवस्था सोशिक खिन्नव्यक्ती सारखी होती. जयराम खचून गेला. त्याला वाटले आपल्या त्यागाची माती होणार. दुसऱ्या बाजूला त्याला अपराधी वाटले. तो विलक्षण अस्वस्थ झाला. 

जयरामने मनोरमासाठी शेवठी आपल्या बायकोची साडी पेटीतून काढून दिली. जपून ठेवलेली त्याच्या बायकोची फुलाफुलाची अस्पर्शसाडी त्याने बाहेर काढून दिली. त्या साडीचे महत्व म्हणजे जयरामने कमलाला ती एकमेव प्रेमभेट दिली होती. पण पैसे नसल्यामुळे मनोरमासाठी आता एवढेच करू शकतो. मनोरमा ती साडी घालण्यासाठी वाहिनी रागावतील ? नाही रागावणार साडी घे. मनोरमाने साडी घातली जीव आभाळएवढा झाला. जयरामला खूप समाधान वाटले.

कमलाला कुठेतरी उध्दवस्त झाल्यासारखे वाटले. कुंका गंधाच्या बाटलीवर देखील तिचा एकटीचा अधिकार कुटुंबात कधीच नव्हता. दिवसभर श्रमाने दमून चिडचिड्या झालेल्या नवऱ्याला समजावून सांगत असते. आपणही नटू, सजू, फिरायला, नाटक, सिनेमाला जाऊ अशी तिचीही भावना असते. पण तिने स्वामित्वचा आनंद तिने जपला होता. मनोरमाने साडी नेसली तिला वाटले गल्लीतल्या इतर स्त्रीयांसारखे भरभरून ती मला भांडेल साडी हिसकावून घेईल, पण तसे न करता, सुखाशी तडजोड करता करता राग, संताप, कधीच तिचा मावळून गेला होता. ती कुटूंबामध्ये साशिकतेचे, समंजसपणाची भूमिका घेत होती. आपले वैभव आपला नवराच आहे. यामध्येच समाधान व्यक्त करत होती. 

मनोरमा बाहेर आली तेंव्हा जयराम खांबाला टेकून वाट पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोवळे कुतूहल होतं, आपल्या भावाकडे पाहून ती निखळ हसली. सूर्य प्रकाशासारखं स्वच्छ हसली, सर्व दु:खाची जळमटं जळाली. सर्वच दु:ख भावाचे हरवून गेले. येथे पारंपरिकते प्रमाणे भाऊ बहिणीचे रक्षण आणि लाड पुरवतो ही संस्कृतीचे लक्षण म्हणावे लागेल. मनोहर जयरामला सावत्र भाऊ. शिक्षण आय. टी. आय. केले आणि वृत्तपत्रात जाहिरात आल्यामुळे धरमपेठेला जाण्यासाठी पैशाची मागणी करतो. जयरामने कोटाच्या खिशातून शेवटचे नाणी तो मनोहारच्या हाती ठेवतो. एवढा उदार अंत:करणाचा जयराम आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र विचार करतो. 

कमल ही सर्व घरातील व्यक्तींची सरबरास करत होती. अक्का आजारी असतांना देखील तिची काळजी पूर्णपणे घेत होती. पदराला हात पुसणाऱ्या आपल्या (कमला) सखीकडे त्याने मनभरून पाहिले. त्याला ती मलूल थकलेली वाटली, तिचे सोेंदर्य कुठेतरी हरवून गेले आहे. माझ्यामुळे तिला खूप श्रम पडतात असे जयराम मनाशीच बोलायचा पण कमलाने मात्र जयरामला कधीच निराश केले नाही. माझी सोशिकता फक्त एक तडजोड आहे. या एका शब्दासाठीच श्रम केले, दु:ख सोसले हे सगळे आतातरी बरे होईल. सोशिकतेचा अर्थ आतातरी बदलेल असे म्हणत तो आपल्या सखीच्या पापण्यांकडे एकाग्रतेने पाहत भावी जीवनाचे स्वप्न रंगवत होता. 

थोडक्यात 'सये लुझे डोळे' हा भारत ससाणे यांच्या लघुकथा लेखसंग्रहातील कथा ही जयराम-कमला या सोशिक कुटुंबामध्ये जीवन जगतांना आलेले सत्य अनुभव प्रकर्षाने व्यक्त करतात. घरातील आर्थिक परिस्थिती आणि संयुक्त कुटुंबामध्ये एकटाच व्यक्ती काम करून व सर्व मंडळी घरी बसून खात असल्यामुळे आणि त्यात सावकाराचे घरासाठी वडीलांने काढलेले कर्ज या तडजोडीमध्ये जयराम व कमला आपल्या दोघांच्याही विचार, भावना, कल्पनांवर आवर घालून घुसमट पद्धतीने जीवन जगतात. पण ही परिस्थिती पुन्हा राहणार नाही. घरातील अंधार, घराच्या उतरत्या छपरा, दु:ख, श्रम, दारिद्रय, या सर्व गोष्टी जावून एक नवचेेतन्य पुन्हा येईल अशी भावना बाळगतात.

Previous Post Next Post