झेल्या या कथेतील शिक्षकांची उदासीनता स्पष्ट करा

झेल्या या कथेतील शिक्षकांची उदासीनता स्पष्ट करा

झेल्या' या कथेतील शिक्षकांची उदासीनता स्पष्ट करा ?

'झेल्या' ही कथा व्यंकटेश माडगूळकरांच्या 'माणदेशी माणसं' या कथासंग्रहातील आहे. या कथेतून विद्यार्थी आणि शिक्षक यांतील भावबंध कसे घनिष्ट आहेत हे सूचित होते. तसेच शिक्षक व्यवस्थेतील 'शिक्षक' हा त्या व्यवसायाचा कणा मानला जातो; पण एका रागीट शिक्षकामुळे व त्याने केलेल्या शिक्षेमुळे एखादा विद्यार्थी (झेल्या) शिक्षणावर पूर्णपणे पाणी सोडून देतो. ही बाब शिक्षकव्यवस्थेत खूप निंदनीय स्वरूपाची आहे. त्याच वेळी त्याच्या जागी महिन्याकाठी पंचवीस रुपये पगार घेऊन विद्यार्थीप्रिय शिक्षक कंत्राटी बेसवर तीन महिन्यासाठी निंबवडे शाळेत येतो. 

दुष्काळ आणि  शिक्षण घेऊन बेकार असलेला शिक्षक पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी कुठे चाकरी मिळते तेथे कार्य करणारा शिक्षक हा मात्र विद्यार्थीप्रिय होता. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्याचे मानशास्त्र ओळखून त्यांच्या कलाप्रमाणे ज्ञान देणारे शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. मुलांना मराठी, गणित, व इतर विषयाचे हसत-खेळत उजळणी वर्गाची तयारी त्या शिक्षकांनी केलेली आहे. म्हणून ते शिक्षण व्यवस्थेमधील विद्यार्थी केंद्री शिक्षक झाले. 'झेल्या' या कथेच्या मुख्य नायकाला शिक्षणाच्या प्रवाहमध्ये आणण्याचे कार्य याच शिक्षकांनी केले. 

 शिक्षकाची उदासीनता म्हणजे शाळेच्या पिछाडीला असलेल्या एका अंधाऱ्या खोलीत राहणे, सकाळी धोतर आणि कळशी घेऊन ओढ्यावर जाणे. अंघोळ करून येताना कळशीभर पिण्यासाठी पाणी घेऊन येणे, चहा, करून शाळेला जाणे, मुरमुरे, माप-दोन माप दुध पिणे आणि घोंगडीवर अंग टाकणे, एकलकोंडे राहणे, रॉकेल तेलाच्या चिमणीच्या प्रकाशात पुस्तके वाचणे, घोंगडीवर पडल्यावर भविष्याची चिंता, दु:खमय आयुष्याचा विचार ही उदासीनता येथील व्यवस्थेमुळे आली आहे.

 शिक्षकाची नोकरी कायम नसल्यामुळे सतत मनाला बोचणारी बेकारी, दुष्काळ या चक्रव्युहामध्ये अडकलेला कंत्राटी शिक्षक मात्र उदास जीवन जगत होता. मात्र त्यांनी मुलांच्या ज्ञानामध्ये कधीच उणीव भासू दिली नाही. आपल्या शिकवणीचा फायदा मुलांच्या सुधारणामध्ये होत होता. मात्र असे म्हणता म्हणता त्या शिक्षकांचे तीन महीने संपून गेले.  शिक्षकाची कायम नोकरी नव्हती, तात्पुरत्या तीन महिन्यांपुरते असल्यामुळे त्याला शाळा सोडून जावे लागणार होते. झेल्याला मारून त्याला शिक्षणव्यवस्थेच्या बाहेर ज्या शिक्षकांने त्याला लोटले होते तेच शिक्षक पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू होणार होते. 

त्यामुळे तीन महिन्यासाठी कंत्राटी पध्दातीवर आलेल्या शिक्षकाला पीटाची टीचभर खळगी भरण्यासाठी कुठे चाकरी मिळते याच्या शोधात ते वणवण भटकणार होते. हे सत्य नाकारता येणार नाही. झेल्या या शिक्षकांच्या शिष्य होता. शिक्षक शाळा सोडून जाणार म्हटल्यावर झेल्या व इतर विद्यार्थ्यांनाखूप वाईट वाटते. कारण एवढे स्थितप्रिय, मनमिळावू, ज्ञानी, मिश्कील स्वभावाचे शिक्षक म्हणून त्यांची विद्यार्थ्यांमध्ये छबी उमटली होती. शेवटी शिक्षकाला ती शाळा व निंबवड हे गांव सोडून जावे लागते. 

'झेल्या' या कथेतील शिक्षक हा शासनाची ध्येय धोरणे व गावाकडे पडलेला दुष्काळ या चक्रव्युहात अडकला होता. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये उदासीनपणा, नेेराश्य दिसून येते. भरकटत जाणारी व्यवस्था यामुळे खरे शिक्षक व्यवस्थेच्या बाहेरच आहेत. हे सूचित होते. 

Previous Post Next Post