भातशेतीमधील बेडकांची संख्या अचानक कमी झाली तर, भाताच्या पिकावर काय परिणाम होईल ?

भातशेतीमधील बेडकांची संख्या अचानक कमी झाली तर, भाताच्या पिकावर काय परिणाम होईल ?

प्रश्न

 भातशेतीमधील बेडकांची संख्या अचानक कमी झाली तर, भाताच्या पिकावर काय परिणाम होईल ?

उत्तर

बेडकांची संख्या कमी झाली, तर नाकतोड्यांची संख्या वाढेल. भाताच्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होईल.

(iii) कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल व कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल ? 

उत्तर : 

भातपीक → नाकतोडा → बेडूक → साप ही अन्नसाखळी निसर्गत: सुरू असते. या अन्नसाखळीचे स्वरूप बदलले तर निसर्गातले संतुलन बिघडते. काही कारणांनी बेडूक कमी झाले, तर द्वितीय भक्षक कमी होतील. हे कमी झाल्यावर तृतीयक भक्षक म्हणजे साप कमी होतील. बेडूक कमी झाल्यामुळे नाकतोडे, म्हणजे प्राथमिक भक्षक वाढतील. सापांच्या कमतरतेने उंदीरही वाढतील.

(iii) भारतातील कोणकोणत्या राज्यांत भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते 

उत्तर 

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते.

Previous Post Next Post