अन्नपचनानंतर निर्माण झालेली अमिनो आम्ले आपल्या शरीरात कुठेकुठे व कोणकोणत्या रूपांत वापरली जातात

अन्नपचनानंतर निर्माण झालेली अमिनो आम्ले आपल्या शरीरात कुठेकुठे व कोणकोणत्या रूपांत वापरली जातात

प्रश्न

 अन्नपचनानंतर निर्माण झालेली अमिनो आम्ले आपल्या शरीरात कुठेकुठे व कोणकोणत्या रूपांत वापरली जातात ?

उत्तर

 

 

अन्नपचनानंतर प्रथिनांपासून अमिनो आम्ले तयार होतात. या अमिनो आम्लांपासून शरीराच्या निरनिराळ्या भागात योग्य तशी प्रथिने पुन्हा निर्माण होतात. उदा., i) रक्तात - हिमोग्लोबिन व प्रतिपिंडे 

ii) त्वचेत - मेलॅनिन व केरॅटीन 

iii) हाडात - ऑस्सीन 

iv) स्वादुपिंडात - इन्सुलिन व ट्रिप्सीन 

v) पीयूषिका व इतर सर्व अंतःस्रावी ग्रंथीत - विविध संप्रेरके 

vi) स्नायूत - अँक्टीन व मायोसिन 

vii) सर्व पेशींत प्रदव्य पटलाची प्रथिने व विविध विकरे.

Previous Post Next Post