सौर पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते

सौर पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते

प्रश्न

 सौर पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते.

उत्तर

 

 

i) सौर पॅनेलची जोडणी करताना अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडले जातात.

ii) यातून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनेल बनवण्यात येतात.

iii) ज्या वेळी दोन सौर घट एकसर पद्धतीने जोडले जातात, तेव्हा दोन्ही घटांच्या विभवांतराची बेरीज होऊन एकूण विभवांतर मिळते, मात्र विद्युतधारेची बेरीज होत नाही. 

iv) ज्या वेळी दोन सौर घट समांतर पद्धतीने जोडले जातात, तेव्हा दोन्ही घटांच्या विद्युतधारांची बेरीज होते, मात्र विभवांतराची बेरीज होत नाही. 

v) अनेक सौर पॅनेल पुन्हा एकसर आणि समांतर रितीने जोडून पाहिजे तेवढी विदयुतधारा आणि विभवांतर मिळवता येते. 

vi) अनेक सौर पॅनेल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग आणि अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर अँरे तयार होतो.

या प्रकारे सौर घटांपासून आवश्यक तेवढी विदयुत शक्ती निर्माण करता येते.

Previous Post Next Post