पाण्याचे विविध स्त्रोत कोणते ? महाराष्ट्रातील जलसिंचन पद्धतींची माहिती लिहा

पाण्याचे विविध स्त्रोत कोणते ? महाराष्ट्रातील जलसिंचन पद्धतींची माहिती लिहा

पाण्याचे विविध स्त्रोत कोणते ? महाराष्ट्रातील जलसिंचन पद्धतींची माहिती लिहा. 

उत्तर 

पाणी हे अत्यंत महत्वाचे आणि मोेल्यवान संसाधनाचा आहे. भारतातील मान्सून पर्जन्य हा जलसंसाधनाचा प्रमुख स्त्रोत आहे. नदया, हिमनदया, सरोवरे, झरे, विहिरी हे पाण्याचे दुय्यम स्त्रोत आहे. 

महाराष्ट्रातील जलसिंचन पध्दती - 

अ) ठिबक सिंचन - i) जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकाचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन पिकांच्या मिळांशी त्यांच्या गरजेपुरते प्लॅस्टिक नळ्यांचे जाळे पसरवून सुक्ष्म नळया किंवा बटनांद्वारे थेंबाथेंबाने किंवा बारीक धारेने पिकांना पाणी देण्याच्या आधुनिक पद्धतीला ठिंबक सिंचन म्हणतात. 

ii) १९८६ मध्ये नाशिक जिल्हात अवर्षण परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि द्राक्षे बाग वाचविण्यासाठी प्रथमच ठिंबक सिंचन संच वापरण्यात आला. 

iii) आज महाराष्ट्रात सुक्ष्मलक्षी जलसिंचन तंत्रज्ञान अवलंबिल्यामुळे कृषी उत्पादकता वाढली आहे. 

iv) महाराष्ट्र शासनातर्फे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा म्हणून ठिंबक सिंचन संचाच्या खरेदीच्या किंमतीत शासनातर्फे ५०% सुट दिली जाते. त्याचा परिणाम म्हणून देशातील ६०% ठिंबक सिंचन एकट्या महाराष्ट्र राज्यात आहे. 

ब) तुषार सिंचन - i) या पद्धतीत पंपाच्या सहाय्याने पाण्याला आवश्यक तो दाब देऊन लहानलहान छिद्रांद्वारे फवाऱ्याने पिकांना पाणी दिले जाते व त्याचे समान वितरण होते. 

ii) या पद्धतीने पावसाप्रमाणे जमिनीवर पाणी शिंपडले जाते. 

iii) या पद्धतीमुळे पारंपरिक जलसिंचन पद्धतीच्या तुलनेने ३० ते ३५ टक्के पाण्याची बचत होते तर उत्पन्नात १० ते १५ टक्के वाढ होते. 

iv) या पद्धतीमुळे पाण्याच्या फवाऱ्याने पिकांची पाने सतत धुतली जातात. त्यामुळे रोगराई व किडाचे प्रमाण कमी होते. 

v) त्याचप्रमाणे जमिनीत पाणी साचत नाही. जमीन खारट होत नाही. परंतु तुषार सिंचन वृक्ष पिकांना उपयोगी नाही. तसेच ठिंबक सिचनाच्या मानाने तुषार सिंचनावर होणारा खर्च आधिक असतो. 

vi) महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र तुषार सिंचनाना वापर होत असला तरी ठिंबक सिंचनाच्या मानाने या पध्दतीच्या अवलंब कमी आहे. 

Previous Post Next Post