आई नसल्यामूळे निवेदकाला दु:ख वाटते या विधानाचा परामर्श द्या

आई नसल्यामूळे निवेदकाला दु:ख वाटते या विधानाचा परामर्श द्या

राम शेवडीकरांना 'आई तुझ्या शिवाय' याआत्मनिवेदनातून आईचे महत्त्व कसे सांगितले आहे ते लिहा ?

किंवा 

आईचे संस्कार ही कुटुंबव्यवस्थेला कणा असतो 'आई तुझ्या शिवाय' या लेखातून चित्रित होते. स्पष्ट करा ?

किंवा 

आई नसल्यामूळे निवेदकाला दु:ख वाटते या विधानाचा परामर्श द्या ?


उत्तर 

राम शेवडीकर लिखित 'आई तुझ्या शिवाय' हा प्रस्तूत आत्मनिवेदात्मक पाठ त्यांच्या 'मुक्काम पोस्ट आई' या संपादित ग्रंथातून घेतला आहे. निवेदकांनी आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत. यातून निवेदकाची संवेदनशीलता प्रामुख्याने दिसून येते. ज्या आईने कुटूंब उभारणीसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावून कुटुंबाची उभारणी केली, अत्यंत गरिबीच्या दिवसातून तिने जीवन व्यवस्थत केले. आज सर्व काही वैभव तिच्यामुळेच आहे. प आईच हे सर्वश्रीमंतीच वैभव पाहण्यासाठी जीवंत राहिली नाही याची खंत निवेदकला वाटते. 

कथेला निवेदक हा 'उद्याचा मराठवाडा' या वृत्तपत्राचा संस्थापक व संपादक अशी दुहेरी भूमिका बजावणारा आहे. दैनिक उद्याच्या मराठवाडाच्या दिवाळी अंकाची दरवर्षी राज्यस्तरावरची अत्यंत प्रतिष्ठेची पारितोषिके मिळतील आम्हाला सतत प्रतिष्ठा मिळाली. आज यशाचे शिखरावर नसलो तरी यशाच्या हिरव्यावर मऊशार हिरवळीवर चालतानाही पाय जमिनीवरच आहेत. यापाठीमागे आमच्या आईचे संस्कार आहेत. 

निवेदकाचे बालपण खेड्यातील आहे. नांदेड जिल्ह्यातील पूर्वीच्या कंधार व आताच्या लोहा तालुक्यातील शेवडी (बाजीराव) हे आहे. जुन्या काळामध्ये बुरुजाचा वाडा, चार-दोन गावाच पांडेपण पणकालांताराने सगळे वैभव संपले. उरले फक्त बुरुजांचे वाडे मग जगण्याची लढाई सुरू झाली त्यामध्येआमचे कुंटूंब मोठे मलाभाऊ आणि दोन बहिणी या सगळ्यांना सांभाळायचे आणि तेही घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच म्हणजे तारेवरची कसरत करून आमच्या आईने आम्हाला ताठ मानेनं सन्मानाने समाजात वागायला शिकवते. हे आईचे संस्कार आम्ही कधीही धुळीला मिळविले नाहीत. 

आई म्हणजे घराचे वैभव, देवभोळी, पण डोळसवृत्तीची असल्याने घरात सनावारांना तिची सोवळ्याची पूजा, स्वयंपाक गोडधोड स्वरूपाचा, स्वच्छता ही राखण्यामध्ये तिचा हात कुणीही धरत नाही, पण घरच्या गरीबीमूळे कधी कधी तर बुरुजाची माती विकल्याशिवाय चूल पेटत नाही. अशा गरिबीचे खटके खात तिने देवांची अनेक स्त्रोत्रे तोंडपाठा, पोरांना सोबत घेऊन पोथ्यांने वाचन आपली मूले सुखात रहावी असा ध्यास बाळगणारी खूपच मेहनती, कष्टाळू वृत्तीची होती. देवभोळी असल्याने प्रत्येक सणला उपवास करत होती. उदा: चातुर्मास, नवरात्र आपली वाटचाल प्रमाणिकपणे राहावी म्हणजे आनंदाची 'चटणी-भाकरी' मिळते ही सदैव शिकवण आईने दिले. गरिबीचे दिवस आज आहेत उद्या नाहीत असा कुटूंबाला आधार देत उभ्या आयुष्यात ती मागे सरकली नाही. 

आईच्या माहेरी म्हणजे आईला तिन्ही बहिणीच होत्या. मामा नसल्याने आजीही आमच्याकडेच राहत होती. तिला आजोबाचे पेन्शन मिळत होते. 1 तारीख आली की आमच्या कुटूंबात नवचैतन्य राहत होते. पण नंतरची परिस्थिती सांगता सोय नाही. कारण 1 तारखेला आजोबाचे पेन्शनचे पैसे मिळत होते या साऱ्या परिस्थितीमध्ये आईची कुंचबणा होत होती. पण ती रोजच्या जगण्याचाच भाग म्हणून सगळ विसरायची. खुप सोसायची, संकटाच्या दु:खाच्या टोकावर ती कधीही उगमगायची नाही. आम्ही शिक्षणासाठी नांदेडला असताना 'कमवा आणि शिका' याचा आधार घेऊन तिन्ही भावंडानी नांदेडला शिक्षण पूर्ण केले. हळूहळू पत्रकारीतेत आलो आलो. आमचे आध्यात्मिक गुरु होते नारायण महाराज हिंगोलीचे त्यांच्याकडून आम्हाला विश्वासप्राप्त झाला. त्याच आश्रमाच एक आध्यात्मिक मासिक प्रकाशित होत होते. आई व गुरूच्या सहकार्याचे 'प्रिंटीग प्रेस' ची मशीन मिळाली, मासिकाचे काम रात्री उशीरापर्यत चालू असल्यामूळे घरी येण्यास उशीर होत असे. त्या वेळपर्यत आई झोपी जात नाही. हीआईचे प्रेम उभ्या आयुष्यामध्ये कधीच फिटणारे नाही. 

गरिबीचे जीवन जाऊन हळू हळू कोेटूंबिक परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ लागली, पण आई मात्र स्वभावानं तशीच सोशिक देवभोळीच राहिली तिला गंगास्नानाचे भारी आकर्षण होते. ऊन, वारा, पाऊस कांहीही न मानता ती गोदावरीला जाऊन स्नान करायची, गंगास्नानानं शरीर आणि मन दोन्हीही पवित्र राहते, असा समज आम्हाला आवर्जून सांगते. आई म्हणजे आमचं अखंड ऊर्जास्त्रोत होता. 

कोेटूंबिक परिस्थितीमध्ये सुधारणाहोतानाच आमच्या कुटूंबाला एक प्रकारचे ग्रहण लागले. आम्ही तिन्ही भाऊ वेगळे राहून संसार करू लागलो. याचे आईला खूप दु:ख होत होते. श्रीमंती असूनही तिच्या वाट्याला पुन्हा शोषणंच आले. डोळ्यासमोर हसतं-खेळत गोकुळ विखुरल्याच्या वेदना तिला दिवसरात्र व्हायच्या. तिच्या मनाला होणाऱ्या वेदना हृदयचिरून घेत होत्या. माझा वाढदिवस ती गिडीपाडवा असल्याने विलक्षण आनंद वाटत होता. वडिलांच्या माघारी या 20 वर्षे तिने आम्हाला प्रेम दिले. प्रसिध्दव्यंगचित्रकार व स्तभलेखक शिवाजी जवरे यांचा आई सांत्वनपर फोन आला होता. त्यावेळी अक्षरश: माझ्या पायाखालचीवाळूच निसटून गेली. खूप दु:ख होत होते. पण गुंडीपाडवा आला मी की आईची तीव्र आठवण उभी राहते. 

आज आई आठवताना अवतात तिचे संस्कार, तिने दिलेला आत्मविश्वास प्रामणिकपणा, आणि प्रचंड कष्टाची सवय या कष्टानेच आज संपूर्ण संपन्नता आली. संकटाची तीव्रता वाढल्यानंतर पुन्हा उभे राहण्यासाठी स्वत:चे दैनीक सुरू करण्यासाठी मोठी संकटे झेलावी लागली. आईच्या संस्कारानेच वाढलेली पत्नी बँकेत नोकरी करून मला उभा करण्यासाठी साथदिली. मुलगा शिक्षण घेऊन 'व्यवस्थापनशस्त्र' घेऊन पदव्युत्तर पदवी पास होऊन एका राष्ट्रीय दैनीकात काम करू लागले. सर्व कांही आनंदी आलबेल सुरू होते. पण आज बुरुजा एवढे सुख उपभोगायला आई नाही. पण तिची सदैव आठवणी आणि तिचा संस्कारीरूपाच्या प्रेरणा आम्हाला जगण्याचे बळ देत होत्या. 

थोडक्यात राम शेवडीकर यांनी आई कुटूंबाचा आधारस्तंभ असते. आई शिवाय जीवन जगण्यामध्ये कांहीच अर्थ उरत नाही. आईचे कष्ट हे आपल्या उभ्या आयुष्यात तिच्या कष्टाची परतफेडकोणीच करत नाही. आज श्रीमंतीचे वैभव आईमुळेच मिळाले पणआज आईच नसल्यामुळे हे सर्व बुंरजाचे  वैभव कमीपणाने भासल आहे. याची खंत निवेदकाला वाटले. 


Previous Post Next Post