लोककला आणि अभिजात कला यांतील फरक स्पष्ट करा

लोककला आणि अभिजात कला यांतील फरक स्पष्ट करा

'लोककला' आणि 'अभिजात कला' यांतील फरक स्पष्ट करा.

उत्तर : 

'लोककला' आणि 'अभिजात कला या दोन कलांच्या परंपरांमधील फरक

 लोककला

 अभिजात कला

 

1. लोककला ही अश्मयुगीन काळापासून  अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे. 

2. लोककलांचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो.


3. लोककला या कोणत्याही नियमांनी बांधलेल्या नसतात.

4. लोककलेची निर्मिती लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते व ती उत्स्फूर्त असते.

5. स्थानिक परिसर, परंपरा, पूजा पद्धती नियमांच्या यांचा प्रभाव लोककलांवर पडलेला असतो. विविध लोकसमूहांत विविध प्रकारच्या लोककला आढळून येतात.

 

1. अभिजात कलांची एवढी दीर्घ परंपरा नाही.

2. अभिजात कला या लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित नसतात.

3. अभिजात कला या प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेल्या असतात.

4. अभिजात कला आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

5. नियमांच्या चौकटींमुळे अभिजात कलांमध्ये विशिष्ट घराणी, पद्धती वा शैली निर्माण होतात. 





Previous Post Next Post