वृत्तपत्रे व नियतकालिके यांतील फरक स्पष्ट करा
उत्तर
वृत्तपत्रे व नियतकालिके यांच्या प्रकाशनाचा कालावधी, त्यांचे स्वरूप आणि उद्देश यांत वेगळेपणा आढळतो. या दोन्हींमधील फरक पुढीलप्रमाणे
वृत्तपत्रे | नियतकालिके |
1. वृत्तपत्रे ही चालू घडामोडींचा ऐतिहासिक दस्तऐवज असतो. 2. वृत्तपत्रांत बातम्या, लेख, स्तंभालेख, अग्रलेख इत्यादींना महत्त्व असते. 3. वृत्तपत्रे दररोज़ प्रकाशित होतात. त्यांना 'दैनिक' असेही म्हटले जाते. 4. स्थानिक देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या बातम्या ताबडतोब पुरवणे, हा वृत्तपत्रांचा मुख्य हेतू असतो. 5. वृत्तपत्रे विशिष्ट विषयाला बांधलेली नसतात. समाजातील घडणाऱ्या सर्व घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य वृत्तपत्रे करतात. 6. वृत्तपत्रांचे महत्त्व तात्कालिक असते. विविध लोकमत घडवणे, जागृत करणे आणि शासनसंस्थेवर अंकुश ठेवणे हे वृत्तपत्रांचे हेतू असतात. | 1. नियतकालिकांमध्ये ताज्या बातम्यांना महत्त्व नसते. 2. नियतकालिके विषयांना प्राधान्य देऊन त्यावर लेख प्रसिद्ध करतात. 3. प्रकाशनाच्या नियतकालिकांना साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वार्षिक इत्यादी म्हटले जाते. 4. बातम्या न पुरवता मनोरंजक व ज्ञानवर्धक मजकूर पुरवणे, हा नियतकालिकांचा हेतू असतो. 5. नियतकालिके विशिष्ट विषयांना वाहिलेली असतात. वाड्मयीन भाषा, लिखाणपद्धती आणि बाह्यस्वरूप या दृष्टीने नियतकालिके वृत्तपत्रांपेक्षा वेगळी असतात. 6. विविध विषयांची विपुल माहिती दिली जात असल्याने नियतकालिके अभ्यासाची, संशोधनाची आणि इतिहासाची महत्त्वपूर्ण साधने मानली जातात. |