भारतीय समाज व्यवस्थातील बदलत्या मानवी जीवनमुल्यांची सविस्तर माहिती लिहा ?
किंवा
भारतीय समाज व्यवस्थेतील बदलती मानवी मानवीमुल्यांवर माहिती लिहा ?
उत्तर
'द्योतक' ही कथा किंबहुने यांची आहे. या कथेतून भारतीय समाज व्यवस्थेतील बदलत्या मानवी जीवनमुल्यांचे प्रत्यंतर घडते यांची मांडणी केली आहे.
अहो-अहो यांचे भावविश्व, अगंतूग आणि प्रेमळ असे काकांच्या स्वरूपातून मानवी जीवन मुल्यांचे प्रत्यंतर घडते हे दिसून येते. ही कथा अहोजाहो या नामकांशी गुरफटली असून समाजव्यवस्थेत हा नायक ज्योतिषाच्या म्हण्यानुसार वागतो. परंतु शेवटी त्याला लक्षात येते की आपण तरुण माणूस आहे. आपल्याला देवांनी घडविले आहे. आपणही समाजासाठी व स्वत:साठी सक्षेम आहोत हा अर्थ सुचित होतो.
अहोजाहो हा कथेचा नायक वयामध्ये येतो. कोणत्याही गोष्टी माहिती असल्यासारखे बिनधास्त बोलतो उदा: पानटपरीवरील मैत्राच्या राजकारणाच्या गप्पा, रिक्षेवाल्याला इतर शहरातील रस्त्यांच्या गप्पा, डॉक्टराशी पर्यावरण व आरोग्य विषयक गप्पा असे वायफळ बडबड करतो. अहोजाहोंच्या घराच्या डाव्या बाजूला अंगतूगंच घर आणि उजव्या बाजूला चांगल जगायला सांगणाऱ्या काकाच घर होते. अहोजाहोची मैत्रीण म्हणून अंगतुगंला जास्त भाव देत नव्हता. पण अंगतुंगला गरज पडली की पैशाची मात्र खुप मदत करत होता. चांगले जगायला सांगणारे काका तर दोघांचेही जवळजवळ मित्रच होते. कांकाना टी.व्ही. घ्यायचा होता तेंव्हा आहोजाहोंनी टीव्ही बद्दल काकांना खूप अशी माहिती सांगितली; शिवाय फ्रिजबद्दलची माहिती सांगितली. असा संवाद अहोजाहो आणि काकांचा होतो.
अहोजाहो आणि अंगतुंग दोघाचीही वार्षिक परीक्षा येते. काकांशी चर्चा करून दोघेही अर्धातास कॉलेजमध्ये गेले होते. काकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अगुंतूगला खुप आनंद झाला. कारण की वर्गात आहोजाहोच्या पाठीमागच्या बाकावरच अगंतुगंचा नंबर होता. पेपर देण्यासाठी सर वर्गात आले. त्यांनी प्रामाणिकपणे आधीच सांगितले की , "तुम्ही पेपर लिहिताना मला अजिबात घाबरू नका". तुमच तुमच चालू द्या. फक्त गोंधळ करू नका. मला दम्याचा त्रास आहे. हे ऐकून त्यांना आनंद वाटला. थोड्या वेळात परीक्षासुरू झाली अहोजाहोच्या उत्तर पत्रिकेतील सर्व अगंतुगने पाहून लिहिले. पेपर संपल्यावर अगंतुगं, अहोजाहोंकडे पाहून हसली. अहोजाहोंना ती निर्लज्ज वाटली. हे सगळं आपल्याला चांगल जगायला लावणाऱ्या काकांना सांगायचं. काकांना परीक्षेत झालेला सर्वप्रकार अहोजाहोने सांगितला. त्यावेळी अगंतुगं ही तेथेच होती. ती पुन्हा आली. अहोजाहो पुन्हा गोंधळले. काका अहोजाहोंना म्हणाले "संतापू नका, शांत रहा. प्रयत्न करा चांगल जगा" अहोजाहोंना काकांना दाखवायचं असते की आपण तरुण आहोत आपल्याला राग येतो, रक्त सळसळतं; परंतु काकांनी नंतर शांत रहा असा सल्ला दिला. तुमचं रक्त सळसळतं आहे, पण भावनेच्या भरात काहीही करून बसाल. याला जिम्मेदार तुम्ही तरुणच आहेत. तुम्ही शांत रहा असा सल्ला काका देतात.
परीक्षा संपली एकमेकांना विचारून एकमेकांच पाहून, गाईड्सचे कात्रणे पाहून पण सरांवा दमा आयुष्यभर तसाच राहणार होता. त्याच अहोजाहोना खूप वाईट वाटल. कारण त्या सरांना दमा बरा करायला कॉपी करता येत नाही. परीक्षा संपल्यावर आपल्या स्कूटरवर सरांना घरपर्यंत अहोजाहोंनी सोडले. पानपट्टीसमोर स्कुटर लावून अहोजाहो काऊंटरवर रेलून उभे राहिले. आणि पानवाल्या मित्राला म्हणाले "गुरुदेव एका ज्योतिष्याने आम्हांला २००३ साली वेड लागेल म्हणून सांगितले आहे. पानवाला मित्र म्हणाला २००३ म्हणजे आजून सातवर्षे होय. वेड लागणार याचा अर्थ मोठी गोष्ट आहे आणि येथून पुढे सात वर्षे कसे घालवायचे हा प्रश्न अहोजाहोला पडला आहे.
पानवाल्या मित्राला अहोजाहो हा सात वर्षे कसे घालवायचे असा सल्ला विचारतो पण पानवाला मित्र काही सल्ला देत नाही हे कळाल्यानंतर अहोजाहो सरळ चांगले जगायला सांगणाऱ्या काकांकडे येतो. ज्योतिषांची सर्व कहानी सांगतो आणि काकाला म्हणतो की, "मी सात वर्ष काय करू" कारण सात वर्षानी मला वेड लागणार आहे. काकांच्या पुढे प्रश्न गंभीर होता. पण काकांनी त्याला उत्तर दिले की, "वेड लागण्यापूर्वी चांगल कसं जगता येईल ?" वेड वशैरे अशा काहीच गोष्टी नसतात. मानवावे जीवनात येऊन आपले जीवन चांगले जगावे हे सर्व खोटे आहे. तुमच्या मनातून हा विचार काढून टाका असा सल्ला दिला. तसेच चांगले उद्बोधन ही केली की, "अहोजाहो तुम्ही" चांगल जगा, शांत रहा, प्रयत्न करा ! व्यायाम करा, दूध प्या, मस्तसकाळी उठा, वाचा आणि ऐका, सिनेमे पहा त्यानंतर एवढं बोलून अहोजाहो तिथून निघून गेले. पण एवढे बोलून ही चांगलं जगा म्हणणाऱ्या काकांनी 'सळसळत्या रक्ताचा तरुण' आहेस म्हटलेच नाही.
अहोजाहो हा संध्याकाळी अंगतुंग ला भेटायला जातो. आपण सुडोेल आणि शिवाय आकर्षकही आहोत. असे न सांगताच "केस मोकळे सोडून अहोजाहोकडे पाहत उभी होती. अहोजाहोंनी अगंतुंग ला ज्योतिषांची सर्व गोष्ट सांगितली त्यावर तिच्या कडून सल्ला मिळाला तो उद्या सांगते, अहोजाहो घरी आले जेवण करत बसले. सात वर्ष जेवत बसता येणार नाही हे कळल्यावर अहोजाहो घराच्या अंगणात आले. नेहरू शर्ट आणि पायजमा घातलेला एक माणूस दिसला तो कपाळावर हात ठेवून स्वत:हाशीच म्हणायचा "कपाळ कस पायजे ? भSSव्य" तो असेच म्हणत फिरत होता. असचं आपण देखील रात्रभर असचं फिरणार. सातवर्ष कशी पायजे होता छोटी छोटी मनाला त्यांच्या चांगलाच वचक बसली होती. झोपतांना अहोजाहोंना वाटलं की 'रिप व्हॅन विकल' जसा वीसवर्ष झोपला आपणही सातवर्ष झोपू मला वेड लागले आहे म्हणून अशा अनेक कल्पना त्यांना अस्वस्थ करत होत्या.
दुसऱ्या दिवशी अंगतूगं भेटली तीला लगेच विचारले "चल सांग काय करू मी सातवर्ष, तू सांगते म्हणाली होतीस, पण अगंतुगं ने वेगळचं अहोजाहोनां उत्तर दिले. तुम्ही मला खूप आवडता आपण एकत्र हिंडू, एकत्र फिरू आणि लग्न करू पण एक अट अशी आहे की, तीन वर्षानंतरचे मूल करायची, त्यावर रागावून अहोजाहोही म्हणतो की, सात वर्ष मला तोंड दाखवू नकोस त्यावर अगंतुगं चिडमन म्हणाली, "तुमचं हे फार वाईटाच आहे." बाप दाखव नाही तर श्राध्दकर", हेच वाक्य पुन्हा:पुन्हा म्हणते'तो आपल्या मित्राकडे (पानवाल्या) पानटपरीकडे निघून जातो.
पानवाला मित्र अहोजाहोना सकाळी ६ ते १० या वेळात गप्पा मारण्याचे आश्वासन देतो. पानवाल्या कडून पान खाताना घरच्या तव्याची आठवण येत नाही पण तवा आहे याची खात्री असतेच. असा भास होतो. कारण ज्योतिष्यानं सांगितलेलं फक्त गृहीत धरण्यासारखं होतं पण कधीना कधी वेड लागायची पाळी आपल्यावर येणार यासाठी अस्वस्थ होतो.
अहोजाहो शेवटी आपल्या शिक्षकाकडे येतात. "मला सात वर्षासाठी मुक्ती पायजेत" असा सवाल करतो. त्यावर सर म्हणाले की अहो, पण त्या ज्योतिष्याचं खर काय म्हणून समजायंच तो उद्या कितीही सांगेल. तुम्हालाच का म्हणून वेड लागेल, मलाका नाही का वेड लागणारा असा संवाद दोघांचा होतो, शिक्षक त्याला नीट समजावून सांगतात. धीर देतात. पण अहोजाहो सर काहीच सांगत नाही म्हणून तो तेथून उठून जातो.
संध्याकाळी अहोजाहो अगंतुगंच्या घरी जातो. अगंतुगंला आश्चर्यवाटले आणि आनंदही झाला होता. चहापाणी झाल्यावर संसाराच्या रंगीत गप्पा चालू होतात. उदा: आपण संगमरवरीचं घर बांधू परंतू अहोजाहोने 'सात वर्षाबद्दल काय विचार केलास ? असे अगंतुगंला विचारतो. त्याच्या मनामध्ये ज्योतिषांने सांगितले काही जातच नाही हा वेड्यासारखं करतो.
अहोजाहोंनी मनाशी पक्कं ठरवलं होत की आता आपण अगंतुगंकडे जाणार नाही, कारण ती सात वर्षाबद्दल काहीच सागत नाही. चांगल जगायला सांगणारेकाकाही काहीच सांगत नाहीत. त्या सरांनीही काहीच सांगितले नाही, पानपट्टीवाला मित्र देखील सकाळी सहा ते दहा हाच वे देतो अशा बेचैन अवस्थेततो तो अडकला आहे.
अहोजाहो यांनी इतराचे जगण्याचे स्वप्न पाहिजे. त्यावेळी अहोजाहो ला जीवनात खऱ्या अर्थने जाग येते. आपण एक सजीव आहोत आणि काळाबरोबर परिवर्तन करणे हा मानवाचा धर्म मी पेलू शकतो हेच माझ्या जीवनाचं 'द्योतक' आहे असे म्हणून चांगला व्यक्ती म्हणून जीवन जगतो.