'झाड लावणारा माणूस' या लेखातून समाजात पर्यावरण संवर्धनाचा संदेश मकरंद कुलकूर्णी यांनी कसा दिला. ते लिहा ?
किंवा
'समाजातील पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे' झाड लावणारा माणूस या लेखाद्वारे स्पष्ट करा ?
किंवा
मकरंद कुलकूर्णी यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश 'झाड लावणारा माणुस' या लेखातून साकार केला आहे ते लिहा ?
उत्तर
झाड लावणारा माणूस हा प्रस्तूत लेख मकरंद कुलकूर्णी यांचा आहे. या लेखामध्ये पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आसाममधील ब्रह्मापुत्रानदीच्या खोऱ्यात एका अवलियाने हे साम्राज्य म्हणजे उभं केलं आहे. हे साम्राज्य म्हणजे त्यांने तब्बल १४०० एकराहून अधिक जमिनीवर झाडे लावली आहेत. ४० वर्षापासून केवळ झाडे लावणे याच उद्देशाने जीवन जगणाऱ्या या माणसाने "नई धरती फिर बनेगी" असे म्हणून आसाममध्ये जादव मोलाई पायेंग यांनी सुरू केले आहे.
आसाम राज्यातील पायेंग हे मूळचे जो रहाट येथील रहिवासी होते. ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी असलेल्या भोगदाई नदीच्या काठावर त्यांचे गाव. यांच परिसरात मजुली नावाचे बेट आहे. नदीमधील वेगंमध्ये हे मोठे बेट मानले जाते. १९६५ मध्ये या भागात मोठा पुर आला. बेटावरील जंगल संपदा वाहून गेली. जोरहाटच्या परिसरात असलेली सगळी झाडे पुरात नष्ठ झाली होती. तेथे गावकऱ्यांनी चर्चा करून यांनी ओसाड जमीन झाल्यामुळे कांहीच करता येत नाही तर नाही, तुला जमले तर झाडे लाव हा संदेश मोलाई पायंगे यांना मिळाला.
जादव पायंगे यांनी ठरविले की आपण नष्ठ झालेली झाडे पुन्हा उभा करू शकतो. त्यासाठी यांनी वयाच्या सोळाव्या वर्षातच बांबूची झाडे लावून त्यांनी मंजुली बेटावर वृक्षारोपणाची सुरुवात केली. घर शेती आणि दुग्धव्यवसाय, त्यावर संसार चालत असे. त्यात कुठेही खंड त्यांनी पडू दिला नाही. झाडे लावणे व त्या झाडांचे रक्षण करणे हा जणू त्यांचा दिनक्रमच ठरला होता. पाच किलोमीटर पायपीट केल्यानंतर नदी होती. छोट्या होडीतून नदी पार केल्यानंतर पुन्हा काही किलोमीटर चालल्यानंतर झाडे लावण्यासाठी मुक्रर केलेली जागा येई, झपाटून गेल्यागत ते झाडे लावण्याचे काम करत होते. ४० वर्षे या दिनक्रमांत यांनी कधीही खंड केला नाही.
जादव पायंगे यांचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे एक एकरचे जंगल बसविण्यासाठी यादव यांना तब्बल पाच वर्षे लागली. परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर त्यांनी जमिनीची विभागणी केली आणि वृक्षारोपण सुरू केले. झाडे जगावेत म्हणून सतत झाडाचे निगा (काळजी) घेणे सुरू होते. काळजी घेतांना एका झाडाचे निरीक्षण त्यांनी केले तेंव्हा असे आढळून आले की, विशिष्ट प्रकारच्या मुंग्या ही कीड खाऊन टाकत आहेत. जादव यांच्या चाणाक्ष बुध्दीने ते टिपले आणि दुसऱ्या दिवशीपासून सोबत दोन पिशव्या त्यांनी बाळगल्या, एका पिशवीत रोपटे, बिया तर दुसऱ्या पिशवीत मुंग्या, ज्या झाडांना कीड लागली आहे त्या झाडांवर मुंग्या सोडल्या. त्यामुळे बहुतांश झाले कीडमुक्त झाली. समाजोपयोगी कार्या मध्ये अनेक अडथळे येतात. तशाच प्रकारचा अडथळा सरकारकडून जादव पायेंग यांनाही आला परंतु सरकारशी न ढळमळता पायेंग यांनी आपण हाती घेतलेले काम सुरूच ठेवण्याचे ठरविले.
काही दिवसांनी ही झाडे मोठी होऊन त्याला जगलाचे रुप आले. त्या जंगलामध्ये वाघ, गेंडे, गवे, हरिण, हत्ती, माकड, ससे, गिधाडे यांसारखा अनेक पक्षी प्राण्यांचे निवास स्थान झाले. याची माहिती गावामध्ये कुणालाही नव्हती. ती माहिती इ.स. २००८ मध्ये यादव पायेंग यांनी जगाला दिली. जितू बालिता नांवाचा वार्ताहार एका आसामी भाषेतील मासिक साठी काम करत होता. तो जोरहारचाच होता. फोटोग्राफीही उत्तम होती. त्याला गावकऱ्यांनी जादव पायेंग यांच्या कार्याबद्दल सांगितले.
जितू वार्ताहार जादव यांच्या भेटीसाठी जंगलात येतो. तेंव्हा जादव पायंगे यांना तो शिकारी वाटतो. दोघांचा संवाद होतांना गवा त्याच्या मागून येतो तोच यादव यांनी भालाफेकून जितूचे प्राण वाचवितो. या दोघांमध्ये खुप मैत्रीचे संबंध जोडले जाते. २००९ पासून मैत्रीचे संबंध आसुनदेखील २०१२ ला जादव यांनी स्वत: पहिला फोटो काढू दिला.
त्यानंतर जादव यांचे कार्य बाहेर आले. हत्तींचा कळप एकदा गावावर चाल करून आला. त्यामुळे राहिवाशांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी जादव यांना दोषी ठरविले. गावकरी व यादव यांच्यात संघर्ष झाला. एका बाजुल्या जंगलाला आग लावली. हे सर्व प्रकरण जादव यांनी वनखात्याला कळविले. खात्याचे अधिकारी जंगलामध्ये येऊन थक्कच झाली. कारण अशा ओसाड जमिनीमध्ये हे वृक्षारोपण अशक्य होते असे अधिकाऱ्यांना वाटते.
आसाम सरकारने राहिवाशांचे नुकसानभरपाई देऊन जादव यांची प्रशंसा केली. २२ एप्रिल २०१२ रोजी जादव यांचा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने सत्कार केला. त्यांना "फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया" हा पुरस्कार दिला. २०१५ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गोेरविण्यात आले. पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारने जादव यांना संपर्क करण्यासाठी खूप मेहनत घेतली.
संपर्क झाल्यावर जादव म्हणाले की, "मला कशाला पुरस्कार देता" असा उदार अंत:करणाचा व्यक्ती निसर्गावर जिवापाड प्रेम करणारा व्यक्ती होता. पद्मश्री पुरस्काराचा बहुमान मिळाल्यानंतर जादव परदेशात ओळखले गेले. जगाच्या नकाशावर "फॉरेस्ट मॅन" ही ओळख संपूर्ण जगात आहे.
अशा निस्वार्थ भावनेपोटी निसर्गावर खुप प्रेम करणाऱ्या व्यक्ती अमेरिकेने बालोवले एप्रिल २०१६ मध्ये त्यांना जर्मनीचे बोलावणे आले. मात्र आजही जादव हे जंगलातच बांबूच्या झाडावर निवारा करून राहतात. पायात चप्पल न घालता जंगल पालथे घालण्यासाठी ४० वर्षात बदल झालेला नाही. अशा महान निसर्गप्रेमीला समाजातील तमाम जनतेचा आशीर्वाद.
थोडक्यात निसर्गाचे संतूलन टिकवण्यासाठी झाडे लावणे ही एक काळजी गरज आहे. समाजात पर्यावरण समतोलासाठी झाडे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावले तर दुष्काळांच्या झळा कोणालाच बसणार नाहीत. म्हणून 'झाले लावा, झाडे जगवा' ही संकल्पना खऱ्या अर्थाने साक्षात कृतीनिशी उतरावी असे वाटते.