'बिकट वाट वहिवाट नसावी' या फटक्यातून मानवी जीवनासाठी कोणते उपदेश अनंत फंदी देतात ?
किंवा
अनंत फंदी यांनी 'बिकट वाट वहिवाट नसावी' या फटक्यातून मानवाला कोणते उपदेश सांगितले आहे ते लिहा ?
उत्तर
"बिकट वाट वहिवाट नसावी" या फकट्यातून आनंद फंदी मानवाला जीवन जगतांना उपदेश करतात. की जीवनात प्रामाणिकता, सरळमार्गीपणा, कष्टयुक्त नीती मुल्ये, आचरणात आणावी.
माणसाने संसार करताना प्रामाणिकपणे करावा. संसारातील सरळमार्ग केंव्हाही सोडू नये.
"बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको |
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको |
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलू नको |
अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको."
मानवाने व्यवहारामध्ये केंव्हाही खोटे बोलू नये, अंगी सदा नम्रता असावी. कुणावरही राग धरू नका. जीवन जगताना नास्तिकपणे वागून कोणाचाही रोष आपल्यावर ओढळून घेऊ नये. आपल्या घरी आलेल्या. अतिथिंना मुठभर द्याला मागे-पुढे पाहू नये. कारण ते आपल्या जीवनातील सहजीवनात आलेले अतिथी असतात.
मायबापावर रुसू नको
दुर्मुखलेला असू नको
व्यवहारामधि फसू नको
कधी रिकामा बसू नको
परी उलाढाली, पोटासाठी करू नको ||१||
आई-वडीलांवर कधीही रुसू नये. व्यवहार करताना प्रमाणिकपणे करावा, फसू नये. नेहमी मानवाने उद्योगी असावे. कधीही रिकामटेकडा राहू नये. पोटाची खळगी भरण्यासाठी नको ते उद्योग करू नये तर सरळमार्गी, प्रामाणिकपणे उलाढाली कराव्यात.
कोणत्याही व्यक्तीला दोष, उणेपणा, खुण या गोष्टी काढून शरमायला उणे करू नये. उणे कुणालीही बोलू नये. कोणत्याही व्यक्तीला संसार करताना बुडवू नये. मी मोठा शहण, धनाढ्य म्हणून गर्व करू नये. कारण एका पेक्षा एक जगामध्ये श्रीमंत असतात हे लक्षात ठेवावे. पाठबळ किंवा मोठ्याचा आश्रम आपल्या पाठीमागे आहे म्हणून गोर गोरगरिबांना छळू नये. त्यांना मारू नये कारण दोन दिवसामध्ये असलेली सत्ता निघून जाईल आणि अपयश आपल्या पदरी पडेल म्हणून श्रीमंतीचा गर्व, मोठेपणाचा आव कोणाही आणू नका.
"विडा पैजेचा उचलू नको
उणी तराजू तोलूं नको
गहण कुणाचे डुलवू नको.
उगिच भीक तूं मागूं नको.
स्नेहासाठी पदरसोड कर, परंतु जामीन राहू नको.
विडा पैजेचा उचलू नका, घेतलेले कर्ज बुडवू नको, आणि कारण नसतानाही भीक मागू नये. स्नेह, प्रेम, माया, वात्सल्यासाठी स्वत: खर्च करावा. परंतु कोण्याही गुणेगाराचा जामिन म्हणून जावू नये. व्यवसाय करताना वजन काट्यामध्ये कोणालाही फसवू नका. तर प्रमाणिक व्यवहार करा. सरळमार्गी व्यवसाय करावा.
कोणाचीही निंदा, स्तुती, प्रशंसा स्वहितासाठी करू नये. मानवाने शहण्याशी खुशामत करावी पण; मूर्खाशी मैत्री करू नये. कष्टीची भाजी-भाकरी हीच संसाररूपी आहे; पण तूपसाखरेची चोरी करू नये. जसे देवांनी आपल्याला ठेवले आहे तसेच रहावे. आपण केलेला धनसंचय हा सत्कार्यासाठी वापरावा, उगीच खर्च कारणे टाळावे. सत्कार्यासाठी आपल्या धनसंचय मार्गी लावणे हे मानवाने कर्तव्य आहे.
सुविचारा कातरूं नको
सत्यंगत अंतरू नको.
व्दैताला अनुसरूं नको
हरिभजना विस्मरूं नको.
सत्कर्ती-नोेब्दिचा डंका गाजे मग शंकाच नको"
चांगले विचार (सुविचार) नेहमी जवळ बाळगावे. सत्यंग करावा, व्दैताला अनुसरू नये, नेहमी हरिचे भजन करावे. त्याचे विस्मरण होऊ देऊ नये. म्हणून मानवावे सत्कीतींचाडंका मोठा नगारा, घेऊन सत्कार्य करावे.
थोडक्यात "बिकट वाट वहिवाट नसावी" या उपदेशपर फटक्यातून मानवी जीवनात प्रामाणिक, सरळमार्गीपणा, कष्टमुक्त नितीमूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणावा. असा उपदेश केला आहे.