'सूर्यनारायणा' या कवितेचा आशय तुमच्या शब्दांत लिहा ?
उत्तर :
'सूर्यनारायणा' या कविता ना.धो.महानोर यांची असून 'पानझड' या काव्यसंग्रहातून घेतली आहे. प्रस्तुत कवितेत मानव आणि पशु-पक्ष्यांच्या जीवसृष्टीतील, जगण्यातील अंधार नष्ठ होऊन त्यांचे जीवन शेतातील धान्याचे सुखी व समृध्द व्हावे हा आशावाद सूर्यनारायणाकडून व्यक्त केला आहे.
सूर्यनारायणा तुम्ही दररोज नित्य नेमाने उगवावे. मानव, पशु, पक्षी, सर्व जीवसृष्टतीलअंधार दूर करावा अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवावा. मोडक्या घरावरील चिन्हांने सजवलेल्या घरातील संसाराला तुम्ही दिव्याचा अंधकार दूर करायला या अशी विनंती सूर्यनारायणाला कवी करत आहेत.
"ओजंळीनं भरू देगा पाखरांच्या चोंची |
दु:खात पंखाना असो सावली मायेची"
जीवसृष्टतील पशु पक्ष्यांच्या आणि मानवांना धान्य दे चोची भरूनी. दु:खामध्ये पंखांना सावली मायेची असू दे पशु-पक्ष्यांच्या पंखाना बळ येऊ दे.
"आबादानी होवो शेत भरू दे दाण्यांचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबांचे
तुझ्या पावलाने सूर्यनारायणा शेतामधील पिकांमध्ये भरभराटी येऊ दे. पिकांमध्ये दाणे गच्च भरून ती दाणे जीवसृष्टीला मिळे दे आणि तुझ्या या पालखीला शब्द तुकोबांचे लागू दे अशी आशा सूर्यनारायणाकडून कवी करत आहेत.