स्त्रीयांच्या भावजीवनाचा कसा वेध पी विठ्ठल या कवीने घेतला ते लिहा

स्त्रीयांच्या भावजीवनाचा कसा वेध पी विठ्ठल या कवीने घेतला ते लिहा

कवी पी. विठ्ठल यांनी स्त्रीयांबद्दलची सहानुभूती 'ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे' या कवितेत कशी मांडली ते लिहा ?

किंवा 

स्त्रीयांच्या भावजीवनाचा कसा वेध पी विठ्ठल या कवीने घेतला ते लिहा ?

उत्तर :

"पृथ्वी ही स्त्रीलिंगी आहे" ही कविता पी विठ्ठल यांची आहे. प्रस्तूत कवितेतून स्त्रीवादी विचार मांडला आहे. स्त्रीयांबद्दलची सहानुभूती, स्त्रीयांना मिळत नसलेले स्वातंत्र्य हे विविध प्रतिमांचा उपयोग करून सांगितले आहे. 

पृथ्वी ही प्रतिमा स्त्रीविषयी आली आहे. मुळातच पृथ्वी ही स्त्रीलिंगी आह . या पृथ्वीतलावर अनेक नैसर्गिक साधनसंपत्ती आहेत. त्यापैकी पृथ्वीच्या अंगाखांद्यावरून अविरत पणे वाहणाऱ्या नद्या आहेत. भाषांचे आदिम स्वरांचा विचार करताना 'स्वर' देखील स्त्रीलिंगीव आहेत. 

"भूक, भाकर" आणि तुझी सृजनशील वाणी स्त्रीलिंगी आहे. 

तुझी त्वचा, त्वचेच्या आतली निरंतर भयभीत सळसळ, स्त्रीलिंगी आहे. 

कोणत्याही एकाकी वृक्षाची विस्कटलेली सावली सुध्दा स्त्रीलिंगी आहे. सर्वत्र स्त्री आहे. भूक, भाकर, वाणी, त्वचा, वृक्षाची सावली, ही सर्वच स्त्रीलिंगीच आहेत. यामध्ये विविध प्रतिमांचा व प्रतिकांचा उपयोग कवी करतात. स्त्रीयांबद्दलची सहानुभूती असलेली ही कविता आहे. पृथ्वीवरील सर्व निसर्गसृष्टी मध्ये सर्व स्वरूप ही स्त्रीवादी असतांना दिसून येतात. पृथ्वी, नद्या, भाषेतील आदित स्वर, भूक, भाकर. वाणी, त्वचा, वृक्षांची सावली हे सन्मान स्त्रीयांसंदर्भात येथे आली आहेत. विविध प्रतिमांच्या आधारे स्त्रियाबद्दलचा विचार, सहानुभूती, स्त्रीयांच्या भावजीवनाचा घेतलेला वेध दिसून येतो. 

जमिनीच्या आतील हिरवी, ओल स्त्रीलिंगी, समुद्राची गाज स्त्रीलिंगी आहेत. मानवाच्या रंगीबेरंगी प्रार्थना आणि त्यांचे सुखदु:ख, त्यांच्या जीवनाची कहाणी यामध्ये त्यांना मदत करणारी देखील स्त्रीच असते हे विसरून चालणार नाही. दिवस,  रात्र, पहाट, सकाळ, हवा, भिती, भावना, शपथ, लोणी, ठिपक्यांची नक्षीदार रांगोळी ही स्त्रीसाठी आलेल्या प्रतिमा आहेत. स्त्री ही सर्वाचे दु:ख सहन करणारी व्यक्ती असते. स्त्री हीच व्यक्ती दु:ख सहन करते. कारण पुरूषापेक्षा स्त्रीयांची सहनशिलता जास्त असते. दु:खातून सावरून स्वत:चा संसार चालवण्याची ताकद फक्त स्त्रीच जोमाने करते. 

स्त्रीयांना किती ही दु:ख झाले तरी ती दु:खे अदृश्य होतांना पाहतो. 

"खोल डोहात बुडूनही अदृश्य न झालेली गाथा स्त्रीलिंगी 

शुभशकुनाची वावटळ आणि तळघरातली अडगळ स्त्रीलिंगी 

पापण्यांवरची तुडूंब झेप स्त्रीलिंगी, जाग स्त्रीलिंगी,

क्षितिजाकडे झेपावणारी प्रत्येक दिशा स्त्रीलिंगी 

करुणेची पवित्र बाराखडी आणि कोणत्याही आईची नि:स्तब्ध हाक स्त्रीलिंगी". 

खोल पाण्याचा डोह, वावटळ, तळघर, या प्रतिमांच्या आधारे स्त्रियांचे गोेरव सांगितले आहे. स्त्रियांचे जीवन म्हणजे खोल पाण्यात बुडवल्यानंतर ही तुकारामाची गाथा ही अदृश्य झाली नाही. तसे स्त्रीचे जीवन ही गाथ्या प्रमाणे निर्मळ स्वच्छ आहे. क्षितिजाकडे झेपवणाऱ्या प्रत्येक दिशमध्ये स्त्री जीवनाचे अस्तित्व आहे. स्त्री की करुणेचा भावसागर आहे. प्रेमळ आईची आर्त हाक म्हणजे स्त्री आहे. 

स्त्रीही प्रत्येकांच्या जीवनातील उत्कट सदिच्छा आहे. आपुलकी, प्रेम, माया, वात्सल्य, करुणा ही स्त्रीयांचे उपजत गुण आहेत. सर्व राष्ट्राराष्ट्राच्या सीमा म्हणजे स्त्री आहे. लोकशाहीची ती उपासक आहे. बुद्धांची करुणा आहे. येशूची आंतरिक तगमग आहे. परकेपणाला सदैव आपुलकीने वागणूक देणारी, परकेपणाला नात्यांत उतरवणारी ही देखील स्त्रीच आहे. पण पुरुषप्रधान संस्कृतीला बळी जाणारी स्त्रीच आहे. 

थोडक्यात स्त्री जीवनांचा गोेरव हा विविध प्रतिमांच्या आधारे केला आहे. उदा : पृथ्वी, नदी, स्वर, भूक, भाकर, वाणी, वृक्ष, त्वचा, जमिन, समुद्र, रात्र, पहाट, सकाळ, हवा, विहीर, लेणी, रांगोळी, धुळ, पाणी, वावटळ, जिभ, डोळे, अशा अनेक प्रतिमातून स्त्री जीवनाविषयक सहानुभूती, स्त्रीयांच्या भावजीवनाचा घेतलेला शोध, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रियांचा गोेरव इत्यादी गोष्टी दिसून येतात. 

Previous Post Next Post