पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा

पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा

प्रश्न

पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. 

किंवा 

पर्यटन हा सर्वाधिक रोजगार करणारा व्यवसाय होऊ शकतो, याविषयी तुमचे मत व्यक्त करा. 

उत्तर

 

 

पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत -

i) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने (लॉजेस) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग.

ii) खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग.

iii) हस्तोदयोग व कुटीरोदयोग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने.

iv) हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशुउद्योग.

v) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग.

vi) प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक (गाईडस्), ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात. त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो.

Previous Post Next Post