प्रश्न | पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा. |
उत्तर
| पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते. यांतील प्रमुख तीन प्रकार - i) ऐतिहासिक पर्यटन : पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते. ii) भौगोलिक पर्यटन : अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय. iii) आंतरराष्ट्रीय पर्यटन : आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोर्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय