पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे

पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे

प्रश्न

 पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?

उत्तर

 

 

आधुनिक काळात पर्यटन ही रोजगाराभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे -

i) पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे. 

ii) पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासव्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे.

iii) त्यांना प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत.

iv) ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत. 

v) पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहितीपुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, दुमाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

vi) दिव्यांगांच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

Previous Post Next Post