बेकर्स यीस्ट वापरून बनवलेले पाव व इतर उत्पादने पौष्टिक असतात

बेकर्स यीस्ट वापरून बनवलेले पाव व इतर उत्पादने पौष्टिक असतात

प्रश्न

 बेकर्स यीस्ट वापरून बनवलेले पाव व इतर उत्पादने पौष्टिक असतात.


उत्तर

 


i) पाव बनवताना किण्वन प्रक्रिया होण्यासाठी पीठात बेकर्स यीस्ट म्हणजेच सॅकरोमायसिस सेरेव्हिसी घातला जातो.

ii) व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित यीस्टचा वापर होतो. कोरड्या, दाणेदार स्वरूपातील यीस्ट घरगुती बेकिंगसाठी वापरतात.

iii) व्यावसायिक उपयोगासाठी यीस्ट वापरून बनवलेल्या पीठामध्ये कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्त्वे व खनिजे असे उपयुक्त घटक असतात. त्यात ऊर्जाही जास्त असते. त्यात किण्वनामुळे पौष्टिकता देखील निर्माण होते.

iv) त्यामुळे अशा पिठापासून बनवलेले पदार्थ, पाव व इतर उत्पादने पौष्टिक असतात.


Previous Post Next Post