देशातील प्रातिनिधिक संस्थांमधील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे या विधानावर तुमचे मत मांडा

देशातील प्रातिनिधिक संस्थांमधील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे या विधानावर तुमचे मत मांडा

प्रश्न

 देशातील प्रातिनिधिक संस्थांमधील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, या विधानावर तुमचे मत मांडा.

उत्तर

 

 

i) अनेक रूढी व परंपरांनी महिलांवर विविध बंधने लादून त्यांचे कार्यक्षेत्र घरापुरते मर्यादित केलेले होते. 

ii) त्यामुळे निरक्षरता, घरगुती हिंसाचार, अप्रतिष्ठा इत्यादी सर्व प्रकारचे अन्याय महिलांवर होत होते. हा अन्याय दूर होण्यासाठी देशातील सर्व प्रातिनिधिक संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, असे मला वाटते. 

iii) कुटुंबरचना, सामाजिक परिसर, आर्थिक व राजकीय अशी क्षेत्रे महिलांसाठी खुली झाली पाहिजेत. 

iv) या सर्व संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत महिला सहभागी झाल्या, तर त्या या संस्थांना नवी दिशा देऊ शकतील.

v) त्यामुळे महिलांच्या कार्यक्षमतेस वाव मिळेल. त्यांच्यावरील अन्याय दूर होईल व त्यांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान वाढण्यास मदत होईल, असे मला वाटते.

Previous Post Next Post