स्थानिक पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन यांतील फरक स्पष्ट करा

स्थानिक पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन यांतील फरक स्पष्ट करा

'स्थानिक पर्यटन' आणि 'आंतरराष्ट्रीय पर्यटन' यांतील फरक स्पष्ट करा 

उत्तर 

स्थानिक पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन यांत पुढील फरक दिसून येतो:


 स्थानिक पर्यटन

 आंतरराष्ट्रीय पर्यटन

 

1. आपल्या राज्यात किंवा देशांतर्गत केल्या जाणाऱ्या पर्यटनास 'स्थानिक पर्यटन' असे म्हणतात. 

2. देशांतर्गत पर्यटनास सरकारच्या परवानगीची कागदपत्रांची गरज नसते. कागदपत्रे सतत जवळ बाळगण्याची गरज नसते.

3. स्थानिक पर्यटन सहजसुलभ असते.


4. स्थानिक पर्यटन आपल्या सोयीने करता येते व ठरलेल्या कार्यक्रमात बदलही करता येतो. 

5. या पर्यटनात देशात कोठेही व कितीही काळ वास्तव्य करता येते.

6. पर्यटक स्वत: च्या देशाचे चलन वापरतो. परिचित चलनामुळे व्यवहार सुलभतेने होतात. 

7. हे पर्यटन जास्त खर्चीक नसते. 

8. पर्यटनकाळात आपल्या मातृभाषेत किंवा राष्ट्रीय भाषेत इतरांशी संवाद साधता येतो.

 

1. आपल्या देशाच्या सीमेच्या बाहेरील प्रदेशांत केल्या जाणाऱ्या पर्यटनास 'आंतरराष्ट्रीय पर्यटन' असे म्हणतात.

2. आंतरराष्ट्रीय पर्यटनास त्या देशाच्या व्हिसाची गरज असते. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय व्हिसा | मिळत नाही. कागदपत्रे सतत जवळ बाळगावी लागतात.

3. आंतरराष्ट्रीय पर्यटन अपरिचयामुळे सहजसुलभ नसते.

4. आंतरराष्ट्रीय पर्यटन ठरलेल्या मार्गानेच करावे लागते. त्यात आपल्या सोयीने बदल करता येत नाही. 

5. ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच वास्तव्य करावे लागते. त्यात वाढ करता येत नाही. 

 6. पर्यटनकाळात त्या देशाचे चलन वापरावे लागते. अपरिचयामुळे चलन वापरताना पर्यटकांचा गोंधळ उडतो.

7. हे पर्यटन खर्चीक असते. 

8. मातृभाषेचा वापर करता येत नाही. पर्यटनकाळात त्या देशाची भाषा किंवा इंग्रजीचा वापर करावा लागतो. 


Previous Post Next Post